मुंबई : क्रिकेटचा देव मानला जाणाऱ्या सचिन तेंडुलकर याने मुलगा अर्जुन तेंडुलकरच्या क्रिकेट बाबतीत एक वक्तव्य केले आहे. सध्या गेले काही दिवस अर्जून तेंडुलकर चर्चेत आहे. १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी झालेल्या आयपीएल ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्स संघाने अर्जून तेंडुलकरला ३० लाख देऊन रीटेन केले आहे. मागच्या वर्षीच्या आयपीएलमध्ये पण अर्जून तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघाकडे होता, मात्र मागच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स कडून त्याने एकही सामना खेळला नव्हता. या वर्षी सचिन तेंडुलकरच्या मुलाला क्रिकेट चाहते प्रत्यक्ष क्रिकेट खेळताना बघू शकतात.
मात्र सचिन तेंडुलकरने अर्जून तेंडुलकरच्या क्रिकेट बाबतीत एक खुलासा केला आहे. सचिन तेंडुलकर अर्जुनला खेळताना कधीही पाहत नाही किंवा त्याचे सामने पाहायलाही जात नाही. अर्जूनने क्रिकेट मोकळे पणाने खेळावं त्याने क्रिकेटचा आनंद घ्यावा, त्याला माझ्या उपस्थितीच कोणतही दडपण यायला नको म्हणून मी त्याचे क्रिकेटचे सामन प्रत्यक्षात मैदानावर जाऊन पाहत नाही असे आज सचिन तेंडुलकर म्हणाला. अर्जूनला आधी फ़ुटबॉल आवडायचे, नंतर तो बुद्धिबळ खेळू लागला आणि आता तो त्याच्या मनाने क्रिकेट खेळू लागला आहे आणि क्रिकेट खेळात तो उत्तम प्रगती पण करत आहे. “अर्जुनने क्रिकेट खेळावं यासाठी आम्ही त्याच्या अजिबात मागे लागलो नव्हतो. जर तुम्ही स्वत:हून एखादी गोष्ट करायची ठरवली आहे तर त्यासाठी तुम्ही १०० टक्के मेहनत घेता. गरज पडल्यास काही तडजोडी करायलाही तुम्ही मागे पुढे पाहत नाही. त्यामुळे अर्जुन असो किंवा सारा… आम्ही कोणालाही कसलाही फोर्स करत नाही. त्यांना त्यांच्या पद्धतीने काम करू देतो”, असेही सचिने स्पष्टपणे नमूद केलं. मी अर्जूनचे सामने पाहायला प्रत्यक्षात कधीच मैदानावर जात नाही कारण एखादा मुलगा मैदानावर खेळत असतो आणि त्याचे पालक मैदानावर उपस्थित असतील तर पालकांना मुलाच्या खेळाचे दडपण असते आणि मैदानावर खेळणाऱ्या खेळाडूला पण आपले पालक मैदानात बसून आपला खेळ बघत आहेत याच दडपण असत.
अर्जूनचा खेळ पाहायची माझी अगदीच इच्छा झाली तर मी मैदानावर जातो आणि लपून त्याचा खेळ बघतो असेही सचिन तेंडुलकर अर्जूनच्या क्रिकेट बाबतीत म्हणाला.
महत्वाच्या बातम्या :
- टीका करून जे गाजावाजा करतात … ; उदय सामंत यांचा राणेंना टोला
- राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेल्या शिवसेना नेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या ”या” नेत्याकडे ५ विधानसभा मतदार संघांची जबाबदारी
- युपी बिहारी भैय्यांबाबतच्या वक्तव्यावर चरणजित सिंग चन्नी यांचे स्पष्टीकरण; म्हणाले…
- नवी मुंबई ते मुंबई प्रवास आता फक्त ३० मिनिटात; वॉटर टॅक्सी सेवेत दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

