चंदीगड : फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात देशातील पाच राज्यांच्या विधानसभेसाठी निवडणुका होणार आहेत. उत्तरप्रदेश, मणिपूर, गोवा, उत्तराखंड आणि पंजाब या पाच राज्यात फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात विधानसभा निवडणूका होणार आहेत. तर या निवडणुकांचा निकाल १० मार्च रोजी लागणार आहे. या पाचही राज्यात निवडणूक प्रचाराने वेग पकडला आहे.
नुकतेच पंजाब राज्याचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांनी प्रचाराचा भाग म्हणून युपी बिहारी भैय्यांबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलं होत. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी युपी, बिहारच्या भैय्यांना पंजाबमध्ये घुसू देऊ नका वक्तव्य केल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. पंजाबमध्ये प्रमुख विरोधी पक्ष असणारा आम आदमी पक्षाने सुद्धा काँग्रेस आणि मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांच्यावर टीका केली होती. उत्तर प्रदेशातही निवडणुका होत असल्याने या मुद्द्यावरुन राजकारण चांगलंच तापलं आहे.
चरणजित सिंग चन्नी यांनी पंजाबमध्ये प्रचारादरम्यान युपी, बिहारच्या भैय्यांना पंजाबमध्ये घुसू देऊ नका असे वादग्रस्त वक्तव्य केले होते यावर त्यांच्या शेजारी उभ्या असणाऱ्या प्रियांका गांधी यांनी पण आनंद व्यक्त केला होता. मात्र आज पत्रकारांशी बोलताना चरणजित सिंग चन्नी यांनी युपी बिहारी भैय्यांबाबतच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे. स्पष्टीकरण देताना चन्नी म्हणाले कि, ” पंजाब राज्यात अनेक राज्यातून स्थलांतरित कामगार आले आहेत आणि पंजाबच्या विकासात त्यांचे योगदान पण मोठे आहे व ते कोणी नाकारू पण शकत नाही. मात्र जे युपी बिहारी भय्ये पंजाब राज्याच्या विकासात अडथळा बनून राहिले आहेत त्यांना उद्देशून माझे वक्तव्य होते असे चन्नी यांनी आज स्पष्टीकरण देताना सांगितले.
महत्वाच्या बातम्या :
- ‘निधी वाटपाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी’; कॉंग्रेसची मागणी
- शिवरायांच्या पुतळ्याचे रात्री होणाऱ्या अनावरण प्रकाराबद्दल भागवत कराडांनी व्यक्त केली खंत
- पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपला झटका
- मुख्यमंत्री चन्नी यांच्या टीकेवर योगी आदित्यनाथांची प्रतिक्रिया; म्हणाले…
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना तारखेनुसार शिवजयंती मान्य नाही का?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

