पुणे : शिवसेना पक्ष आणि राणे कुटुंब यांच्यातील वैर सर्वश्रुतच आहे. नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यापासून राणे कुटुंबीय आणि शिवसेना पक्ष यांच्यातील वैर खूपच वाढत गेलं. राणे कुटुंबातील कोणतीच व्यक्ती शिवसेनेवर तोंडसुख घ्यायला विसरत नाही. तर शिवसेनेतील मोठे मोठे नेते पण शक्य असल्यास राणे कुटुंबावर टीका करायला धजत नाहीत.
‘’जे टीका करतात ते आपल्या कर्माने टीका करत असतात. मी टीका करणारा मंत्री नाही. कुणावर टीका ही करीत नाही. टीका करणाऱ्यां ना उत्तरही देत नाही. परंतु , ”टीका करीत जे गाजावाजा करीत फिरतात ते कोकणात निवडणुकीत पडतात. असा असा टोला आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राणे कुटुंबियांना नाव घेता लगावला. उदय सामंत यांनी हिम्मत असेल तर माझ्याविरुद्द माझ्याच विधानसभा मतदार संघात उभे राहून जिंकून दाखवा असे आवाहनही राणे परिवाराला केले.
महराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे आज एक शैक्षणिक कार्यक्रमासाठी पुणे शहरात आले होते तेव्हा त्यांनी टीका करून गाजावाजा करणे हा मूद्दा धरून नारायण राणे, निलेश राणे आणि नितेश राणे यांच्यावर निशाणा साधला.
महत्वाच्या बातम्या :
- राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेल्या शिवसेना नेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या ”या” नेत्याकडे ५ विधानसभा मतदार संघांची जबाबदारी
- युपी बिहारी भैय्यांबाबतच्या वक्तव्यावर चरणजित सिंग चन्नी यांचे स्पष्टीकरण; म्हणाले…
- ‘निधी वाटपाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी’; कॉंग्रेसची मागणी
- शिवरायांच्या पुतळ्याचे रात्री होणाऱ्या अनावरण प्रकाराबद्दल भागवत कराडांनी व्यक्त केली खंत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

