🕒 1 min read
मुंबई : २०१९ च्या नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्र राज्यात शिवसेना, भारतीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांचे मिळून ‘महाविकास आघाडी’ सरकार स्थापन झाले. या तिन्ही पक्षात कुरघोडीचे राजकारण सतत चालूच असते. महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्ष राज्यभर आपला पक्ष कसा वाढवता येईल याचा प्रयत्न करत असतो. आजच राष्ट्रवादी पक्षाने घेतलेल्या निर्णयानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कर्जत-जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांना आगामी विधानसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवून राज्यातील ५ विधानसभा मतदार संघांची जबाबदारी देण्यात आली आहे.
येत्या विधानसभा निवडणुकीत १०० हून अधिक जागा जिंकण्याचे उद्दिष्ट राष्ट्रवादी काँग्रेसने ठेवले आहे. भूम-परांडा, उस्मानाबाद, करमाळा, श्रीगोंदा व पंढरपूर या पाच महत्वाच्या विधानसभा मतदार सांघाची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यावर सोपवण्यात आली आहे. रोहित पवार यांनी फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून आपल्या पक्षाने ही महत्वाची जबाबदारी आपल्यावर सोपविल्याची माहिती दिली आहे. नव्या आणि जुन्या कार्यकर्त्यांना हाताशी धरून या पाचही मतदार संघात आपण राष्ट्रवादी पक्ष वाढवणार आहोत असा विश्वास आज रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.
पंढरपूरमध्ये भाजपचे समाधान आवताडे, श्रीगोंद्यामध्ये भाजपचे बबनराव पाचपुते, भूम-परांड्यामध्ये शिवसेनेचे तानाजी सावंत, उस्मानाबादमध्ये शिवसेनेचे कैलास पाटील आणि करमाळ्यात अपक्ष संजय शिंदे आमदार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला या पाच विधानसभा क्षेत्रात आपला पक्ष वाढविण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे एवढं नक्की.
महत्वाच्या बातम्या :
- युपी बिहारी भैय्यांबाबतच्या वक्तव्यावर चरणजित सिंग चन्नी यांचे स्पष्टीकरण; म्हणाले…
- ‘निधी वाटपाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी’; कॉंग्रेसची मागणी
- शिवरायांच्या पुतळ्याचे रात्री होणाऱ्या अनावरण प्रकाराबद्दल भागवत कराडांनी व्यक्त केली खंत
- पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपला झटका
- IT क्षेत्राला सुगीचे दिवस, येत्या काही दिवसात लाखो रोजगार होणार उपलब्ध
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
