🕒 1 min read
मुंबई : प्रतिष्ठित रणजी ट्रॉफी २०२२ स्पर्धेचा अंतिम सामना (Ranji Trophy 2022 Final) मुंबई आणि मध्य प्रदेश यांच्यात खेळवला जात आहे. दुसऱ्या दिवसअखेर मध्ये प्रदेशने आपल्या पहिल्या डावात ४१ षटकात १ बाद १२३ धावांपर्यंत मजल मारली आहे. मुंबईचा पहिला डाव ३७४ धावांवर आटोपला. सरफराज खानने मुंबईकडून शतक ठोकले. त्यानंतर मध्य प्रदेशकडून यश दुबे (नाबाद ४४) आणि शुभम शर्मा (नाबाद ४१) यांनी सावध फलंदाजी करत शंभपरीपार मजल मारली. सलामीवीर हिमांशू मंत्रीला (३१) तुषार देशपांडेने माघारी धाडत मुंबईने एकमेव बळी मिळवला.
मुंबईचा पहिला डाव
मुंबईने पहिल्या डावात ३७४ धावा केल्या आहेत. मुंबईकडून सरफराज खानने सर्वाधिक धावा केल्या. त्याने २४३ चेंडूत १३४ धावांची खेळी केली. तत्पूर्वी, सलामीवीर पृथ्वी शॉने ४७ आणि यशस्वी जयस्वालने ७८ धावांचे योगदान दिले. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अरमानने २६ धावा केल्या. मध्य प्रदेशकडून गौरव यादवने ४ बळी घेतले. त्याचवेळी अनुभव अग्रवालने मुंबईच्या ३ फलंदाजांना बाद केले.
That's Stumps on Day 2 of the @Paytm #RanjiTrophy #Final in Bengaluru!
After Mumbai posted 374 on the board, Madhya Pradesh moved to 123/1. #MPvMUM
We will be back for the Day 3 action tomorrow.
Scorecard ▶️ https://t.co/xwAZ13D0nP pic.twitter.com/EcEVeA1W2U
— BCCI Domestic (@BCCIdomestic) June 23, 2022
दोन्ही संघांची Playing 11
मुंबई – पृथ्वी शॉ (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, अरमान जाफर, सुवेद पारकर, सर्फराज खान, हार्दिक तामोर (विकेटकीपर), शम्स मुलानी, धवल कुलकर्णी, तनुष कोटियन, मोहित अवस्थी, तुषार देशपांडे.
मध्य प्रदेश – यश दुबे, हिमांशू मंत्री (विकेटकीपर), शुभम शर्मा, रजत पाटीदार, आदित्य श्रीवास्तव (कर्णधार), अक्षत रघुवंशी, सारांश जैन, अनुभव अग्रवाल, गौरव यादव, कुमार कार्तिकेय, पार्थ साहनी.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
