Share

Sanjay Raut : “महाविकास आघाडीतून शिवसेना बाहेर पडायला तयार आहे पण…” ; संजय राऊत याचं मोठ विधान

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारवर संकटाचे ढग दाटून आले आहेत. या सर्व नाराजी नाट्यात विदर्भातील बाळापूर मतदार संघाचे आमदार नितीन देशमुख यांचे नाव चांगलेच चर्चेत होते. त्यांना मारहान झाल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता. यावर देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधला.

नितीन देशमुख म्हणाले, “माझी तबीयत चांगली आहे. मी रात्री ३ वाजता हॉटेलमधून निघालो. रस्त्यावर मी उभा होतो. मात्र १०० ते २०० पोलीस माझ्या मागे होते. ते मला कोणत्याच गाडीत बसू देत नव्हते. त्यांनी मला जबरदस्तीने रुग्णालयात नेले. अटॅक आला म्हणून माझ्यावर उपचार करायचे आहेत, असे सांगण्यात आले. मात्र मला कोणत्याही प्रकारचा अटॅक आला नव्हता. माझा बीपी सुद्धा वाढला नव्हता. त्यांचा हेतू चुकीचा होता. २०, २५ लोकांनी जबरदस्तीने माझ्या दंडामध्ये इंजेक्शन दिले. माझ्या शरीरावर चुकीच्या पद्धतीने प्रक्रिया करण्याचे षडयंत्र त्या लोकांच होत. मी उद्धव साहेबांचा शिवसैनिक असून उद्धव साहेबांसोबतच आहे.”

नितीन देशमुख काय म्हणाले?

नितीन देशमुख आणि कैलास पाटील यांच्या पत्रकार परिषदेत संपूर्ण माहिती दिली जाईल असं संजय राऊत म्हणाले होते. मात्र या परिषदेत फक्त नितीन देशमुख च उपस्थित होते. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या “आमदारांना मावळ्यांनो परत या” अशी हक देत परतण्याचं आवाहन केलं आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

संजय राऊत यांनी देखील माध्यमांशी संवाद साधत भूमिका स्पष्ट केली आहे. त्या सर्व आमदारांची इच्छा असेल की शिवसेनेनं महाविकास आघाडीतून बाहेर पडावं तर तुम्ही २४ तासात परत या. मुंबईत येऊन तुमची भूमिका मांडा , तुमच्या भूमिकेचा विचार जाईल असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केल आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!