🕒 1 min read
मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरून हटवल्यानंतर त्यांनी 46 आमदार सोबत घेऊन वेगळा गट स्थापन केला आहे. यानंतर शिवसेनेने एकनाथ शिंदे यांच्या जागी अजय चौधरी यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली होती. एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत मोठी खळबळ उडवून दिली होती. ट्विटमध्ये शिंदेंनी मोठी घोषणा केली आहे. शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार श्री.भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर आज विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली आहे.
झिरवळ म्हणाले कि, सध्याच्या राजकीय पेचप्रसंगावर एक-दोन दिवसांत निर्णय घेणार असल्याचे महाराष्ट्र विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ यांनी आज सांगितले. ते म्हणाले की, “मला एकनाथ शिंदे यांच्याकडून मिळालेल्या पत्रात ३४ आमदारांची नावे आहेत. कधी कमी बोलतात, कधी जास्त बोलतात. शिंदे यांनी किती आमदारांच्या पाठिंब्याचा दावा केला आहे, याची चौकशी करावी लागेल. एक-दोन दिवसांत निर्णय होईल. यादीतील काही सह्यांवरही संशय आहे. कायद्यानुसार चौकशी करेन. चौकशीसाठी आमदारांना समोर बोलवावे लागेल.”
तसेच बंडखोर आमदारांशी आतापर्यंत कोणताही संवाद झाला नसल्याचे झिरवळ यांनी सांगितले. आता मी अभ्यास करतोय, त्यानंतर निर्णय घेईन, असे झिरवळ म्हणाले. एकनाथ शिंदे पत्र पाठवतील का याचा विचार करू. शिवसेनेत सध्या अजय चौधरी यांना विधिमंडळ पक्षनेते करण्यात आले आहे. शिंदे यांनी जो नेता निवडला आहे तो कायदेशीरदृष्ट्या योग्य नाही, असं देखील झिरवळ म्हणालेत.
अजय चौधरी यांच्यासोबत आमदाराची गरज नाही. ज्या पक्षाचे वर्चस्व असते, तो नेता निवडला जातो. कायद्यानुसार उद्धव ठाकरे यांनी पत्र दिले होते आणि त्यानुसार आम्ही निर्णय घेतला. आतापर्यंत पक्षनेत्याच्या निर्णयानुसार गटनेता निवडला जातो. बाकी कायद्याच्यानुसार निर्णय घेतला जाईल. शिंदे यांच्याकडे दोनतृतीयांश बहुमत असेल, तर ते पत्र पाठवतात का ते पाहू. सध्या शिवसेनेचे सरकार आहे. एक-दोन दिवसांत निर्णय होईल.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
