मुंबई : रणजी ट्रॉफी २०२२ स्पर्धेचा अंतिम सामना (Ranji Trophy 2022 Final) मध्य प्रदेश आणि मुंबई यांच्यात बंगळुरू येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात मुंबईचा कप्तान पृथ्वी शॉने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यशस्वी जयस्वाल आणि पृथ्वी शॉ यांच्या दमदार सलामीच्या जोरावर मुंबईने पहिल्या दिवसअखेर ५ बाद २४८ धावा केल्या आहेत. खेळ थांबला तेव्हा सरफराज खान ४० धावांवर नाबाद होता.
मुंबईचा पहिला डाव
कर्णधार पृथ्वी शॉ आणि यशस्वी जयस्वाल यांनी मुंबईला दमदार सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या गड्यासाठी ८७ धावा केल्या. अनुभव अग्रवालने पृथ्वीची दांडी गूल केली. पृथ्वीने ५ चौकार आणि एका षटकारासह ४७ धावा केल्या. त्यानंतर आलेले अरमान जाफर (२६) आणि सुवेद पारकर (१८) यांना मोठी खेळी करता आली नाही. स्पर्धेतील सलग चौथ्या शतकाकडे वाटचाल करणाऱ्या जयस्वालला अनुभव अग्रवालने रोखले. जयस्वालने ७ चौकार आणि एका षटकारासह ७८ धावा केल्या. पहिल्या दिवसअखेर सरफराज खान ४० धावांवर तर शम्स मुलानी १२ धावांवर नाबाद राहिले. मुंबईने पहिल्या दिवसअखेर ९० षटकात ५ बाद २४८ धावा केल्या. मध्य प्रदेशकडून अग्रवालसोबत सारांश जैनने २ बळी घेतले.
That's Stumps on Day 1 of the @Paytm #RanjiTrophy #Final. #MPvMUM
Madhya Pradesh scalped 5⃣ wickets on the opening Day as Mumbai scored 248 runs.
We will be back for Day 2 action from Bengaluru tomorrow.
Scorecard ▶️ https://t.co/xwAZ13D0nP pic.twitter.com/134DA1o2vy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) June 22, 2022
दोन्ही संघांची Playing 11
मुंबई – पृथ्वी शॉ (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, अरमान जाफर, सुवेद पारकर, सर्फराज खान, हार्दिक तामोर (विकेटकीपर), शम्स मुलानी, धवल कुलकर्णी, तनुष कोटियन, मोहित अवस्थी, तुषार देशपांडे.
मध्य प्रदेश – यश दुबे, हिमांशू मंत्री (विकेटकीपर), शुभम शर्मा, रजत पाटीदार, आदित्य श्रीवास्तव (कर्णधार), अक्षत रघुवंशी, सारांश जैन, अनुभव अग्रवाल, गौरव यादव, कुमार कार्तिकेय, पार्थ साहनी.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

