औरंगाबाद: भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द काढले. या निषेधार्थ उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या वतीने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी भाजप मंत्री नारायण राणे विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच महाराष्ट्राची माफी मागावी नसता शिवसेना स्टाईलने याहून अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.
महाड याठिकाणी आयोजित पत्रकार परिषदेत नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. देशाचा स्वातंत्र्यदिन कितवा हे एखाद्या मुख्यमंत्र्यांला माहीत नाही ही गोष्ट गंभीर आहे. स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव की हिरक महोत्सव ही गोष्ट मुख्यमंत्री सचिवांना विचारतात. हा देशाचा अपमान आहे. राष्ट्रद्रोह आहे. मंत्री राणे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
मी असतो तर कानाखालीच लगावली असती. यावेळी युवानेते अब्दुल समीर यांच्यासह शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, शहरप्रमुख रघुनाथ घरमोडे, शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख दुर्गाबाई पवार, तालुकाप्रमुख दीपाली भवर, युवासेनेचे कैलास जाधव आदी शिवसैनिकांची उपस्थिती होती.
महत्त्वाच्या बातम्या
- सामान्य शिवसैनिक ते केंद्रीय मंत्री; अटक झालेल्या राणेंचा झंझावाती प्रवास
- ‘ठाकरे सरकारच्या कारवाईला आम्ही घाबरत नाही’ ; किरीट सोमय्यांनी दिला सरकारला इशारा
- राणेंच्या घराबाहेर वरुण सरदेसाईंची पोलिसांना अश्लिल शिवीगाळ, मनसेकडून व्हिडिओ पोस्ट
- राणेंच्या अटकेमुळे आम्ही घाबरणार नाही , दडपणार नाही- केंद्रीय मंत्री भारती पवार
- सरकारच्या जीवावर तुम्ही कोणाकोणाला त्रास देणार?; चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारला सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

