Share

‘शेतकरी आंदोलनावरून मोदी सरकारवर टीका करणाऱ्या महाविकासआघाडीची पार्टी जोरात चालू आहे’

Published On: 

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून दिल्ली सीमेवर कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने लादलेले जाचक तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी नेते ठाम आहेत. देशभरातून शेतकऱ्यांना समर्थन वाढत आहे.

या आंदोलनामुळे उत्तर भारतात वातावरण तापले असताना हे कायदे शेतकरी हिताचे असल्याचे सांगणाऱ्यांची देखील संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या आंदोलनाचा प्रभाव महाराष्ट्रावर पडला नसता तर नवलंच वाटले असते यामुळेच महाराष्ट्रातील शेतकरी देखील विविध शेतकरी संघटनांच्या नेतृत्वात दिल्ली सीमेकडे कूच करत आहेत.

राज्यातील काही शेतकरी नेते देखील आक्रमक झाले असून हा कायदा अंबानी-अदानी यांच्यासारख्या उद्योजकांच्या फायद्यांसाठी असल्याचा आरोप करण्यात येत आहे. यामुळेच नुकताच स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार संघटना, शेकाप आदी समविचारी शेतकरी संघटनांनी अंबानी-अदाणींच्या कार्यलयावर मोर्चा देखील काढला होता.

एका बाजूला हे सर्व सुरु असताना तिकडे दुसऱ्या बाजूला पंजाबचे शेतकरी आंदोलनाला बसले आहेत म्हणून मोदी सरकारवर टीका करणारी महाविकासआघाडीची पार्टी जोरात चालू असल्याचे चित्र आहे.भाजप नेते निलेश राणे यांनी सोशल मिडीयावर एक पोस्ट करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

राणे म्हणाले, ज्या महाराष्ट्र राज्यात 48 हजार 969 मृत्यू कोरोनामुळे झालेत त्या राज्याचे मंत्रिमंडळ सगळं विसरून मजा करतयं. महाराष्ट्र तडफडतोय पण मंत्री सत्तेच्या मस्तीत आहेत असं त्यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!