पुणे : दरवर्षी 1 जानेवारीला मोठ्या संख्येने अनुयायी भीमा कोरेगाव इथल्या विजयस्तभांला भेट देतात.मात्र यंदा कोरोनामुळे परिस्थिती काहीशी वेगळी आहेयामुळेच कोरेगाव भीमा जयस्तंभ येथे 144 कलम लागू करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी हे आदेश जारी केले आहेत. अभिवादन कार्यक्रमासाठी बाहेरून येणाऱ्या नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही . प्रामुख्याने लोणीकंद पोलिसस्टेशन हद्दीतील जवळपास आजूबाजूच्या15 गावांमध्ये दिनांक 30/12/2020 ला रात्री 12 पासून ते 2 जानेवारी रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत बाहेर गावातील लोकांना या गावात येण्यासाठी प्रतिबंध घालण्यात आले आहेत.
या परिसरात कोणत्याही प्रकारच्या सभा,त्याकरिता लागणारे मंडप,खाद्यपदार्थ स्टॉल,खेळणी विक्री यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. प्रतिबंध असलेल्या गावात लोकांनी एकत्र येणे,सभा घेणे तसेच शस्त्र व लाठी काठी बाळगणे यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेस सर्वसामान्यांना ताकद देणारा पक्ष : बाळासाहेब थोरात
- ‘विदर्भ पुन्हा एकदा काँग्रेसचा बालेकिल्ला करुन काँग्रेसचे जास्तीत जास्त उमेदवार निवडूण आणू’
- नाताळचा सण सर्वांच्या जीवनात उत्तम आरोग्य घेऊन येवो – अजित पवार
- पद्मावत नंतर संजय लीला भन्साळी यांचा आणखी एक चित्रपट वादाच्या भोवर्यात…
- सरकारची चर्चेसाठी तयारी,वेळ आणि तारीख सांगावी; सरकारचं शेतकऱ्यांना आणखी एक पत्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
