मुंबई : संजय लीला भन्साळी यांचा बहुचर्चित ‘गंगूबाई कठियावाडी’ हा चित्रपट वादाच्या भोवर्यात सापडला आहे. अभिनेत्री आलिया भट्ट गंगूबाईची भूमिका साकारत आहे. भूमिकेतील तिचा लूक देखील समोर आला होता. मात्र आता चित्रपटाचे शूटिंग देखील थांबवले जाण्याची शक्यता आहे. गंगूबाईच्या कुटुंबाने संजय लीला भन्साळी आणि आलिया भट्ट यांच्याविरोधात मुंबई सत्र न्यायालयात खटला दाखल केला आहे.
संजय लीला भन्साळी यांनी लॉकडाउनपूर्वी ‘गंगूबाई कठियावाडी’ या चित्रपटातची घोषणा केली होती. यात कामाठीपुरामधल्या देहविक्री करणार्या महिलांच्या ‘गंगूबाई’ यांचा संबंध मोठ्या गुन्हेगारांशी असल्याचे दाखवले जात आहे. यावर गंगूबाई यांच्या कुटुंबियांनी आक्षेप घेतला आहे. त्यांच्या कुटुंबियांकडून मुंबई शहर दिवाणी न्यायालयात हुसैन झैदी, संजय लीला भन्साळी आणि आलिया भट्ट यांच्या विरोधात 22 डिसेंबरला खटला दाखल करण्यात आला आहे. तसंच या प्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी 7 जानेवारी 2021 पर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे.
वकील नरेंद्र दुबे यांनी सांगितले आहे की, आम्ही आलिया भट्ट, हुसैन झैदी, संजय लीला भंसाळी, भंसाळी प्रोडक्शन, जेने बोरगेस यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. संजय लीला भंसाळी यांनी या चित्रपटात माझ्या अशीलाच्या आईबद्दल अतिशोक्ती आणि गुन्हेगारीशी संबंध नसताना तशी दृष्य दाखवली आहे, ही बाब अत्यंत लाजिरवाणी आहे. त्यामुळे या चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी आम्ही केली आहे.
कोण होती ‘गंगुबाई काठियावाडी’ ? जाणून घेऊया
लेखक एस हुसैन जैदी यांच्या ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकात गंगुबाई काठियावाडी यांचा संदर्भ दिला आहे. गंगूबाई गुजरातच्या काठियावाड येथील रहिवासी होत्या. गंगूबाईचे पूर्ण नाव गंगा हरजीवनदास काठियावाडी होते. यामुळे त्यांना हे नाव मिळाले.
कमी वयातच गंगुबाईला अनेक संकटाना सामोरे जावे लागले. कमी वयात गंगूबाईला वेश्या व्यवसायात ढकण्यात आले होते.यानंतर कुख्यात अपराधी गंगूबाईचे ग्राहक बनले. गंगूबाई मुंबईच्या कमाठीपुराच्या परिसरात कोठा चालवायची. गंगूबाईने सेक्सवर्कर्स आणि अनाथ मुलांसाठी चांगले काम केले होते.
हुसैन जैदीने आपल्या ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकात लिहिले आहे की, माफिया डॉन करीम लालाच्या गँगच्या एका सदस्याने गंगूबाईवर बलात्कार केला होता. यानंतर गंगूबाई स्वतःसाठी लढली आणि करीम लालाची भेट घेतली. गंगूबाईने करीम लाला यांना राखी बांधली आणि त्यांना भाऊ बनवले.
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेस सर्वसामान्यांना ताकद देणारा पक्ष : बाळासाहेब थोरात
- ‘विदर्भ पुन्हा एकदा काँग्रेसचा बालेकिल्ला करुन काँग्रेसचे जास्तीत जास्त उमेदवार निवडूण आणू’
- शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार 2000 रुपये
- चाहत्यांसाठी क्रिकेटची मेजवानी; यंदा एक नव्हे तर तीन बॉक्सिंग डे कसोटी सामने होणार
- ‘निवडणूका आल्या किंवा ते अडचणीत आले, की शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतात’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
