मुंबई : कोविडमुळे झालेले नुकसान लक्षात घेता मद्यविक्री अनुज्ञप्तींना सूट देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. तसेच 2020-21 वर्षासाठीची अनुज्ञप्ती शुल्कात केलेली 15 टक्के वाढ मागे घेण्याचाही निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.
एफएल ३ अनुज्ञप्तीस ५० टक्के, एफएल ४ अनुज्ञप्तीस ५० टक्के, फॉर्म ई अनुज्ञप्तीस ३० टक्के, फॉर्म ई २अनुज्ञप्तीस ३० टक्के सूट देण्यात येत आहे. ज्या अनुज्ञप्तीधारकांनी नूतनीकरण शुल्काचा भरणा यापूर्वी केला आहे अशांना या सवलतीचा लाभ पुढील नूतनीकरणाच्या वेळी मिळेल.वर्ष २०२० -२१ या ताडी वर्षाकरिता करण्यात आलेली ६ टक्के वाढही मागे घेण्यात येईल तसेच १ सप्टेंबर २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीसाठी अनुज्ञप्ती शुल्काच्या प्रमाणात ३ महिन्यांचे अनुज्ञप्ती शुल्क आकारण्यात येईल. ही सूट समायोजनाद्वारे देण्यात येत असल्याने प्रत्यक्ष परतावा मिळणार नाही.
वरील सर्व मद्यविक्रीतून शासनाला मोठा महसूल मिळतो. ५ ऑक्टोबरपासून राज्यातील खाद्यगृहे, व परमिट रूम्समधून आसन क्षमतेच्या ५० टक्केच मर्यादेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे त्यामुळे त्यांचा व्यवसाय ५० टक्केच होतो आहे. परमिट रूम्समध्ये त्यांच्याकडील शिल्लक मद्यसाठा संपेपर्यंत सीलबंद विक्री करण्यास १९ मे पासून परवानगी दिली असली तरी ही परवानगी किरकोळ मद्य विक्री दुकानांमध्ये अतिरिक्त गर्दी होऊ नये म्हणून देण्यात आली होती. शिवाय घरपोच मद्य सेवा सुरु असल्याने या कालावधीत त्यांचाही व्यवसाय झालेला नाही. ताडी व्यावसायिकांचे व्यवसाय ५ ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण बंद असल्याने १ सप्टेंबर २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीतील चार महिन्यांची शुल्क माफी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, राज्य सरकारच्या या निर्णयावर भाजप नेते निलेश राणे यांनी टीका केली आहे. राणे म्हणाले,मद्यविक्रेत्यांना सुट देण्याचा निर्णय महाराष्ट्र मंत्रिमंडळाने घेतला. लोकहिताचे निर्णय ठाकरे सरकार घेत नाही. नियमित कृषी कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहन निधी हे सरकार देणार होतं ते शेतकऱ्यांना मिळालेच नाही पण बेवड्यांची सोय करण्यामध्ये या सरकारला जास्त इंटरेस्ट आहे असं म्हणत सरकारवर तोफ डागली.
मद्यविक्रेत्यांना सुट देण्याचा निर्णय महाराष्ट्र मंत्रिमंडळाने घेतला. लोकहिताचे निर्णय ठाकरे सरकार घेत नाही. नियमित कृषी कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहन निधी हे सरकार देणार होतं ते शेतकऱ्यांना मिळालेच नाही पण बेवड्यांची सोय करण्यामध्ये या सरकारला जास्त इंटरेस्ट आहे. pic.twitter.com/L4Hwzs49Tq
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 24, 2020
दरम्यान,भाजप आमदार श्वेता महाले यांनी देखील टीका केली आहे.आपल्या ट्वीटमध्ये त्या म्हणतात, उद्धव सरकारचा प्राधान्यक्रम काय? शेतकरी की, दारू उत्पादक?कोरोना काळात दारूचा पुरवठा घरपोच!पुरवणी मागण्यांमध्ये वाइन उद्योगासाठी कोट्यावधीची तरतूद! आणि आता मद्य विक्रेत्यांचे अनुज्ञप्ती शुल्क माफ!शेतकऱ्यांना मदत द्यायची वेळ आली की केंद्राकडे बोट! असं म्हणत त्यांनी सरकारला चांगलेच फटकारले आहे.
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेस सर्वसामान्यांना ताकद देणारा पक्ष : बाळासाहेब थोरात
- आम्ही 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू; केंद्रीय मंत्र्याचा दावा
- नाताळचा सण सर्वांच्या जीवनात उत्तम आरोग्य घेऊन येवो – अजित पवार
- पद्मावत नंतर संजय लीला भन्साळी यांचा आणखी एक चित्रपट वादाच्या भोवर्यात…
- कोरेगाव भीमा: जयस्तंभाजवळील गावांमध्ये 30 डिसेंबरपासून 4 दिवस संचारबंदी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

