Share

आम्ही 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू; केंद्रीय मंत्र्याचा दावा

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : नवीन कृषी कायद्यांवरुन शेतकरी संघटना आणि सरकारमधील वाद अद्याप कायम आहे. दरम्यान, केंद्र सरकारने पुन्हा एकदा शेतकरी संघटनांना चर्चेसाठी निमंत्रण दिले आहे. आंदोलक शेतकऱ्यांचे लेखी उत्तर मिळाल्यानंतर २४ तासांच्या आत सरकारने गुरुवारी चर्चेसाठी नवीन निमंत्रण पाठविले.

नवे कृषी कायदे रद्द करणे आणि एमएसपीबाबत लेखी हमी हेच सरकारसोबतच्या चर्चेचे प्रमुख मुद्दे असतील असं शेतकरी आंदोलकांच्या संघटनेकडून जाहीर करण्यात आलं आहे. यावर आता केंद्र सरकारनेही शेतकरी संघटनांना लेखी उत्तर दिलं आहे.शेतकरी संघटनांच्या ज्या काही समस्या असतील त्या सर्व मुद्द्यांवर बोलण्याची आणि त्यावर समाधानकारण तोडगा काढण्याची केंद्र सरकारची तयारी आहे असं उत्तर केंद्र सरकारने शेतकरी संघटनांना दिलं आहे.

शेतकरी संघटनांनी वेळ आणि तारीख निश्चित करावी यासोबतच पत्रात नमूद केलेल्या विषयांव्यतिरिक्त आणखी काही मुद्दे असतील तर तेही सांगावेत. सरकारची चर्चेसाठी तयारी आहे, असं या पत्रात म्हटलं आहे. केंद्रीय कृषी मंत्रालय आणि शेतकरी कल्याण विभागाचे संयुक्त सचिव विवेक अग्रवाल यांनी शेतकरी संघटनांना चर्चेसाठीचं आवाहन केलं आहे. ‘शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंबंधी केंद्र सरकार कटीबद्ध असून शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींसोबत तर्कसंगत चर्चेसाठी सरकार तयार आहे’, असं विवेक अग्रवाल यांनी पत्रात नमूद केलं आहे.

दरम्यान, एका बाजूला हे सुरु असताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी यांसदर्भात एक महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. ठाकुर यांच्या मते, ‘अनेक शेतकऱ्यांनी नवीन कृषी कायद्यांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद दिले आहेत. आम्ही 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू. सरकार त्या शेतकऱ्यांच्या शंकांबाबत बातचीत करण्यास तयार आहे, जे या कायद्यांना विरोध करत आहे त्यांच्याशी बातचीत केल्यानंतरच यावर उपाय निघू शकतो’.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!