Share

मराठवाड्यात नवीन रेल्वेमार्ग, दुहेरीकरण, विद्युतीकरण पूर्ण करणार; केंद्रीय अर्थ राज्यमंत्री कराडांचे आश्वासन!

Published On: 

औरंगाबाद : मराठवाड्यात रेल्वेमार्गांचे दुहेरीकरण करण्याच्या कामाला गती देऊ तसेच औरंगाबाद-नगर रेल्वेमार्गाचा विकास आराखडा तयार करावा, मनमाड-परभणी दुहेरी रेल्वेमार्ग करण्यासाठी प्रयत्न केला जाईल. औरंगाबाद- चाळीसगाव, जालना-खामगाव, रोटेगाव-कोपरगाव या नवीन रेल्वेमार्गांसाठी पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिली. विकास योजनांचा विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते.

ते म्हणाले, ‘ग्रामीण भागात राष्ट्रीयीकृत बँकांच्या नवीन शाखा सुरू करण्यात येतील. विस्तारीकरणासाठीही पाठपुरावा केला जाईल. प्राचीन स्मारके संवर्धनासाठी प्रयत्न करा. अजिंठा, दौलताबाद येथे रोप वे तयार करण्यासाठी सर्वेक्षण करावे. घृष्णेश्वर, अहिल्यादेवी कुंड, दौलताबाद या ठिकाणी साउंड व लाइटची सुविधा उपलब्ध करण्याकरिता बँकांच्या सीएसआर फंडातून निधी उपलब्ध करून दिला जाईल,’ असे आश्वासन त्यांनी दिले. नगर नाका ते दौलताबाद टी पॉइंट रस्त्याचे चौपदरीकरण, दौलताबाद बायपास, औट्रम घाटातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी उपाययोजना केल्या जातील.

चिकलठाणा येथे पिटलाईन तयार करण्याच्या प्रस्तावाला रेल्वे मंडळाने तत्त्वतः मंजुरी दिली आहे. निधीसाठी अर्थ विभागाकडे हा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. लवकरच पिटलाईन तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. यासाठी सात हेक्‍टर जागा निर्माण करावी लागणार असल्याचे नांदेड विभागीय व्यवस्थापक उपिंदर सिंग यांनी सांगितले आहे. केंद्रीय अर्थराज्यमंत्री खासदार डॉ. भागवत कराड यांच्या पुढाकाराने हा प्रश्न मार्गी लागण्यास मदत मिळाली. कराड यांच्या पाठपुराव्यानंतर नांदेड विभागाने तसा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला होता. याबाबत लवकरच निर्णय घेऊन पिटलाईनबाबतही लवकरच निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन कराड यांनी यावेळी दिले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!