Share

…मग आरएसएसचा ‘सरसंघचालक’ हा मुस्लिमांचा बनवणार का?; संभाजी ब्रिगेडचा सवाल

Published On: 

पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी ‘भारतात राहणाऱ्या हिंदू आणि मुसलमानांचे पूर्वज एकच आहेत. आपल्या दृष्टीने हिंदू हा शब्द आपली मातृभूमी, पूर्वज आणि समृद्ध सांस्कृतिक वारशाचा प्रतिशब्द आहे. म्हणूनच आम्ही प्रत्येक भारतीय नागरिक हिंदूच आहेत असे मानतो. कोणाच्याही मताचा येथे अनादर होणार नाही. परंतु आपणास मुस्लिम वर्चस्वाचा नव्हे तर भारतीय वर्चस्वाचा विचार करावा लागेल’, असे वक्तव्य केले होते. यावरुन राज्यात नवा वाद पेटला आहे. या वादात आता संभाजी बिग्रेडने उडी घेतली आहे.

‘हिंदू आणि मुस्लिमांचे पूर्वज एकच होते’ असा सरसंघचालक मोहन भागवत यांना साक्षात्कार आहे की दृष्टांत. मग आरएसएसचा ‘सरसंघचालक’ हा मुस्लिमांचा बनवणार का? असा सवाल संभाजी बिग्रेडने उपस्थितीत करत जोरदार घणाघात केला आहे.

https://www.facebook.com/santosh.shinde.33449138/posts/4236540173067157

मग याच आरएसएस आणि हिंदुत्ववादी विचारांनी आजपर्यंत हिंदू-मुस्लीम वाद लावून दंगली का घडवल्या, समाजात सामाजिक तणाव निर्माण करून वातावरण गढूळ का केले? हजारों मुलांचे या धार्मिक दंगलीत जीव गेले मग त्यांना आजपर्यंत का भडकवले गेलं?. का हजारो लोकांचे संसार देशात उद्ध्वस्त केले? कुणाला कोणता धर्म स्वीकारायचा हा अधिकार कायद्याने प्रत्येक भारतीयाला दिलेला आहे, असं म्हणत संभाजी ब्रिगेडने भागवत यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!