Share

‘तुकाराम मुंढेंना पुन्हा नागपुरात आणा त्याशिवाय अधिकारी सुधारणार नाहीत’

Published On: 

नागपूर : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. यामुळे कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउन जाहिर केले आहे. कोरोनाच्या या काळात अनेक रुग्ण हे ऑक्सिजन आणि अपुऱ्या औषधामुळे बळी पडत आहे.

कोरोनाच्या प्रकोपामुळे नागपूरमध्ये आरोग्यव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याने काँग्रेसचे नगरसेवक बंटी शेळके यांनी विभागीय कार्यालयात प्रचंड गोंधळ घातला. यावेळी त्यांनी तुकाराम मुंढे यांना पुन्हा नागपुरात आणा, अशी मागणी केली. तुकाराम मुंढे यांच्यासारखे खमके अधिकारी असल्याशिवाय सरकारी अधिकारी सुधारणार नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे. बंटी शेळके यांनी विभागीय आयुक्त घातलेल्या या गोंधळाचा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यावेळी त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांवर आरडाओरडा करत ‘यांना जाळून टाकू’, अशी धमकीही दिली. यावेळी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि आमदार अभिजित वंजारीही उपस्थित होते. या सगळ्यांसमोर  बंटी शेळके यांनी सरकारी अधिकाऱ्यांवर चांगलेच तोंडसुख घेतले.

आयएएस ऑफिसर तुकाराम मुंढे हे शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कडक स्वभावामुळे व नियमांच्या चोख पालनामुळे अनेकदा राजकीय नेत्यांचे व त्यांचे खटके देखील उडालेले पाहायला मिळाले होते. त्यांची वारंवार होणारी बदली ही चर्चेची ठरत असते.

महत्वाच्या बातम्या 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!