नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांमध्ये अनेक बडे उद्योगपती सार्वजनिक तसेच खाजगी बँकांना फसवून परदेशात पलायन करण्यास यशस्वी झाले आहेत. या बँक फसवणुकीवरून केंद्रातील भारतीय जनता पक्ष आणि प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस यांच्यात अनेक आरोप- प्रत्यारोप झाले आहेत आणि होत आहेत. नुकताच देशात अजून एक बँक घोटाळा समोर आला आहे. यावरून काँग्रेसने केंद्रातील भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली आहे. एबीजी शिपयार्डच्या (ABG Shipyard) कथित बँक फसवणुकीवरुन काँग्रेसने केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. आज पत्रकार परिषेद बोलताना रणदीप सुरजेवाला यांनी एबीजी शिपयार्डच्या (ABG Shipyard) बँक घोटाळ्यावरून नरेंद्र मोदी यांना धारेवर धरले असून मोदी यांच्याच संमतीने एबीजी शिपयार्डचा 22,884 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप केला आहे.
रणदीप सुरजेवाला यांनी आज सकाळी ट्विट करत या २२ हजार कोटींच्या भ्रष्टाचाराप्रकणी मोदी सरकारला दोषी धरले आहे. स्वतंत्र्य भारतातील ही सर्वात मोठी बँक फसवणूक असून गेल्या ७ वर्षात ५ लाख ३५ हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांचा बँक घोटाळा देशात झाला आहे आणि यामुळेच देशातील बँकिंग व्यवस्था पूर्णपणे उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे असाही आरोप त्यांनी केला. आत्ता पर्यंत एसबीआय बँकेची २ हजार ४६८, आयसीआयसीआय बँकेची 7 हजार 89, आयडीबीआय बँकेची 3 हजार 634, बँक ऑफ बडोदाची 1 हजार 614, पंजाब नॅशनल बँकेची 1 हजार 244 आणि इंडियन ओव्हरसीज बँकेची 1 हजार 228 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या बँक घोटाळ्यांमुळे देशातील बँकिंग व्यवस्था रसातळाला लागली असल्याचा आरोपही काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- ‘हातपाय तोडले तरी लढत राहणार’; किरीट सोमय्यांचा इशारा
- राज्यातील भौगोलिक स्थिती पाहता आता ऑनलाईनकडून ऑफलाईनकडे जावंच लागेल- उदय सामंत
- IPL AUCTION 2022: वीर झारा ऑक्शनमध्ये पुन्हा आमने सामने; मात्र यावेळी बाजी झाराची
- “तुमच्या राज्यात जगायची इच्छा राहिली नाही म्हणत अन्ना हजारेंनी आमरण उपोषण पुढे ढकलले”
- ‘मै झुकेगा नही…’ म्हणत आमदार संदीप क्षिरसागरांचा विरोधकांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

