Share

“तुमच्या राज्यात जगायची इच्छा राहिली नाही म्हणत अन्ना हजारेंनी आमरण उपोषण पुढे ढकलले”

Published On: 

राळेगणसिद्धी: ठाकरे सरकारच्या वाईनविक्री निर्णयावरून राज्यात चांगलेच राजकारण तापते आहे. भाजपने ठाकरे सरकारच्या या निर्णयाला ‘मद्यराष्ट्र’ बनवण्याचा घाट असलायचे म्हटले आहे. तर आता या निर्णयाविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अन्ना हजारे (Senior social worker Anna Hazare) यांनी आक्रमक भूमिका घेतली असून राज्य सरकारला तुम्ही जनतेचे सेवक आहात. मालक नाही. त्यामुळे तुम्ही जनतेची परवानगी घेऊनच निर्णय घेतला पाहिजे. असे म्हटले आहे. तसेच उद्यापासून राज्य सरकारविरोधात ते आमरण उपोषण करणार होते. मात्र त्यांनी हा निर्णय पुढे ढकलला आहे.

“वाईन ही आपली संस्कृती नाही. आपल्या राज्यात दारुची दुकानं कमी आहेत का? तरी तुम्ही किराणा आणि सुपरमार्केटमध्ये वाईन ठेवत आहात. तुम्हाला तरुण पिढीला व्यसनाच्या आहारी लावायचे आहे का? तुमच्या या निर्णयाने मी दु:खी झालो आहे. त्यामुळे मला तुमच्या राज्यात जगायची इच्छा राहिली नाही. असे हताश उद्गार अन्ना हजारे यांनी काढले आहेत.

दरम्यान राज्य सरकारच्या प्रतिनिधींनी काल (१२ फेब्रुवारी) अन्ना हजारे यांच्याशी वाईन विक्रीबाबतच्या निर्णयाबाबत चर्चा केली. यावेळी त्यांनी ग्रामसभेत ही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, किराणा दुकानात विक्री केल्यास महाराष्ट्रातील बालके, तरुण महिला आणि मुलींवर खूप अन्याय अत्याचार होतील. म्हणून मी सरकारला निरोप पाठवला. त्यामुळेच सरकारचे लोक चर्चेला आले. मी त्याला उत्तर म्हणून एकच सांगितलं. तुमचं ऐकलं. आता माझा सरकारला एक निरोप द्या. तुमच्या राज्यात मला जगायची इच्छा राहिली नाही. काल एक्साईज डिपार्टमेंटचे कमिश्नर यांना मी म्हटलं तुमच्यावर विश्वास नाही. तुम्ही वाईन का आणता आणि खुल्या बाजारात का विक्रीला ठेवता? म्हणून मला तुमच्या राज्यात जगायचं नाही.”

तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात वाईन संस्कृती आहे? ज्ञानेश्वर, तुकारामांच्या राज्यात वाईन संस्कृती आहे? असा सवाल करत माझं ८४ वर्ष खूप झालं.. ईश्वराने खूप कामे करून घेतली. काल सेक्रेटरी मुंबईहून आले. मी त्यांना म्हटलं लोकशाहीला मानता मग तुम्ही मनाने निर्णय का घेता? त्यामुळे सेवकाने मालकाची परवानगी घ्यायला हवी. ही लोकशाही नाही, ही हुकूमशाही होईल. असेही अन्ना हजारे यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!