Share

‘मै झुकेगा नही…’ म्हणत आमदार संदीप क्षिरसागरांचा विरोधकांना टोला

Published On: 

बीड: दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) याच्या पुष्पा चित्रपटातील डायलॉग (Pushpa Dialogue) सध्या सुपर हिट झाले आहे. आता याच डायलॉगची भुरळ राजकीय पुढार्‍यांना देखील पडलेली दिसते. बीडमध्ये एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीसागर (NCP MLA Sandeep Kshirsagar) यांनी त्या चित्रपटातील डायलॉग बोलून दाखवला आणि उपस्थित लोकांनी देखील त्याला चांगलीच दाद दिली आहे.

आमदार संदीप क्षीरसागर यांची बीड जिल्ह्यात एक सभा होती. तिथे त्यांनी भाषण केलेला व्हिडिओ तुफान व्हायरल झालाय. त्या भाषणात आमदार क्षीरसागर म्हणतात, मी प्रत्येक निवडणुकीमध्ये सांगतोय, सर्व एक होऊन लढणार आहेत. हे चित्र तुम्हाला अजून सुद्धा दिसेल. जेव्हा लोक सोबत येत नाहीत, तेव्हा ही परिस्थिती होती. आणि ह्या निवडणुकीमध्ये सुद्धा हे सर्व एकत्र येऊन लढणार. पण मला भीती नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

आमदार संदीप क्षीरसागर भाषणात आपल्या विरोधकांना इशारा देताना म्हणाले की, तु्म्ही सर्व एकत्र येऊन लढा. मला भीती नाही. कारण माझ्या आई-बहिणींचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे. युवकांची ताकद माझ्यासोबत आहे. ज्येष्ठांची ताकद माझ्यासोबतय. मी पुष्पा पिक्चर पाहिला. त्या पिक्चरमध्ये डायलॉग होता. झुकेगा नही…एवढीमोठी निवडणूक लढली, ही तर नगरपालिकेची निवडणूक. त्याचं काय एवढं, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!