बंगळुरू : इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू लियाम लिव्हिंगस्टोनला खरेदी करण्यासाठी किंग खानचे केकेआर आणि प्रीती झिंटाच्या पंजाब मध्ये मोठी चढाओढ दिसली. बेंगळुरू येथे सुरु असलेल्या मेगा ऑक्शनच्या दुसऱ्या दिवशी पंजाब किंग्सने (PBKS) ला तब्बल ११. ५० कोटींमध्ये करण्यात आले.
लियामने ऑक्शनसाठी १ कोटी बेस प्राईस ठेवले होते. लियामसाठी कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि PBKS यांच्यात जोरदार बोली लागली होती. मात्र नंतर गुजरात टायटन्स (GT) देखील यात सामील झाले. पण पंजाब किंग्सने बाजी मारली. लिव्हिंगस्टोनचा टी २० फॉरमॅटमध्ये उत्कृष्ट रेकॉर्ड आहे. लिविंगस्टोन आक्रमक फलंदाज आहे. त्याने आतापर्यंत १६४ टी ट्वेन्टी सामन्यांमध्ये ४०९५ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर दोन शतके आणि २३ अर्धशतके आहेत.
लियाम लिविंगस्टोन अजूनही आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करता आलेली नाही. मात्र त्याला मिळालेली किंमत त्याची प्रतिभा दर्शवते. त्याने दोन सिजनमध्ये ९ सामने खेळले आहेत, ज्यात ४४ च्या सर्वोत्कृष्ट खेळीसह त्याला केवळ ११३ धावा केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- शिवसेनेने प्रत्येकवेळी भाजपला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केला- देवेंद्र फडणवीस
- IPL auction 2022 : जयंत यादव आणि विजय शंकर खेळणार गुजरातकडून
- “इतिहास विसरून हे लोक बोलतात आणि…”, फडणवीसांचा हल्लाबोल
- आदित्य ठाकरेंच्या टीकेवर फडणवीसांचे प्रत्युत्तर; म्हणाले,‘कुणी कुणाच्या पाठीत खंजीर…’
- IPL AUCTION 2022: आता रहाणे बनवणार नाईट रायडर्सना ‘अजिंक्य’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

