पुणे: भाजप नेते किरीट सोमय्या (BJP Leader Kirit Somaiya) महाविकास आघाडी सरकारच्या हात धुवून मागे लागले असल्याचे दिसत आहे. पुण्यातील जंबो कोविड सेंटरमध्ये (Pune Jambo Covid Centre) घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) तसेच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर केला आहे.
किरीट सोमय्या पुण्यात आले असताना त्यांना शिवसैनिकांनी (Shivsainik) धक्काबुक्की केली होती. त्यानंतर पुन्हा ते पुणे महापालिकेत आले त्यावेळी भाजप नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार केला होता. त्यानंतर किरीट सोमय्या पुन्हा एकदा आक्रमक झाले असल्याचे बघायला मिळत आहे. धक्काबुक्की प्रकरणी दोन पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे, यावर बोलताना सोमय्या म्हणाले, जर तुम्ही म्हणता तसं काही घडलच नाही तर मग निलंबित का केलं, एवढं का घाबरलात?, असा टोला ठाकरे सरकारला लगावला आहे.
पुढे बोलताना सोमय्या म्हणाले, आतापर्यंत मला १४ नोटीसा आल्या. नोटीसा येणं आता नवं राहिलं नाही. सगळेच नोटीसा काढतात. नंतर हेच नोटीसा काढणारे तुरुंगात जातात. तसेच माझे हातपाय तोडले तरी मी लढत राहणार, राज्याला घोटाळेमुक्त करणारच, असा इशारा देखील किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- राज्यातील भौगोलिक स्थिती पाहता आता ऑनलाईनकडून ऑफलाईनकडे जावंच लागेल- उदय सामंत
- IPL AUCTION 2022: वीर झारा ऑक्शनमध्ये पुन्हा आमने सामने; मात्र यावेळी बाजी झाराची
- “तुमच्या राज्यात जगायची इच्छा राहिली नाही म्हणत अन्ना हजारे उद्यापासून करणार आमरण उपोषण”
- ‘मै झुकेगा नही…’ म्हणत आमदार संदीप क्षिरसागरांचा विरोधकांना टोला
- शिवसेनेने प्रत्येकवेळी भाजपला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केला- देवेंद्र फडणवीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

