Share

संजय लीला भन्साळी यांना कोरोनाची लागण

Published On: 

मुंबई : बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता रणबीर कपूर कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी मंगळवारी सकाळी समोर आली होती. ही बातमी ताजी असतानाच बॉलीवुड मधील प्रसिद्ध निर्माते व दिग्दर्शक संजय लीला भन्साळींना देखील कोरोनाची लागण झाली असल्याचे वृत्त समोर आले आहे. निर्माते संजय लीला भन्साळी यांनी नुकताच आपला वाढदिवस साजरा केला होता.

भन्साळी हे सध्या ते अभिनेत्री आलिया भट्टसोबत ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त होते. पण आता भन्साळी यांना कोरोना झाल्याने या चित्रीकरणाला देखील ब्रेक लागला आहे. तसेच, संजय लीला भन्साळी तत्काळ स्वत: ला क्वारंटाईन करुन घेतले आहे. भन्साळी नंतर या चित्रपटाशी संबंधित इतर सदस्यांचीही कोरोना चाचणी केली जाईल. अभिनेत्री आलिया भट्ट या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

अलीकडेच कामठीपुरा येथील लोकांनी भन्साळी यांच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटाविरोधात मुंबईत निदर्शने केली होती. कामठीपुरा हा मुंबईतील रेड लाईट एरिया आहे. परंतु, आता तेथील तरुण मंडळी या जागेची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणून या चित्रपटामधून आपली राहत असलेला परिसर आहे त्यापेक्षा अतिशय चुकीचा दाखवला जातोय, असा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!