Share

‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटाचे शीर्षक बदलण्याची का होतेय मागणी?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई- संजय लीला भन्साळी यांचा बहुचर्चित ‘गंगूबाई कठियावाडी’ चा नुकताच टिझर लॉन्च झाला आहे. वादाच्या भोवऱ्यात सापडलेला हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टिझर रिलीज झाला आहे. या चित्रपटाच्या टिझरवर लाईक्सचा पाऊस पडत आहे.

आलिया भट्ट या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसत आहे. हा चित्रपट येत्या ३० जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. आलिया भट्टचा या चित्रपटातील अभिनय चाहत्यांना फार आवडल्याचं दिसत आहे.

दरम्यान, आता काठियावाडी शहराची प्रतिमा मलिन करत असल्याची तक्रार करत दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या आगामी ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटाचं नाव बदलण्याची मागणी जोर धरू लागली आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे आमदार अमिन पटेल यांनी ही मागणी केली आहे.‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटाचे शीर्षक असल्यामुळे कामाठीपुरा शहराचे नाव खराब होत आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.

अमिन पटेल म्हणाले, कामाठीपुरा हा परिसर गेल्या अनेक वर्षांमध्ये खूप बदलला आहे. १९५० च्या दशकात जसा हा परिसर होता, तसा तो आता राहिलेला नाही आणि तिथल्या स्त्रियासुद्धा विविध क्षेत्रात काम करतात. या चित्रपटाच्या शीर्षकामुळे काठियावाडी शहराच्या नावाचीही बदनामी होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने या प्रकरणाची दखल घ्यावी.

इतकंच नव्हे तर या चित्रपटातील कामाठीपुऱ्याचा उल्लेख वगळावा, अशी मागणी तेथे राहणाऱ्या स्थानिकांनी केली आहे. या भागात राहत असल्याने विविध प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागत असून आता नव्यानं प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटामुळे आमच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्याची भीती तिथल्या रहिवाशांनी केली आहे.

दरम्यान,‘गंगूबाई काठियावाडी’ या संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या कथेवरसुद्धा आक्षेप घेण्यात आला होता. या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या काही गोष्टी या चुकीच्या आहेत आणि त्यामुळे आमच्या समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे असा दावा कामाठीपुरा येथे राहणाऱ्या काही रहिवास्यांनी केला आहे. तसेच ‘कामाठीपुरा की आवाज’ नावाच्या एका या संघटनेने चित्रपटाविरोधात आवाज उठवला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!