Share

२०१७ साली मनसुख हिरेन यांच्याकडून सचिन वाझेंवर ४० लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप

Published On: 

मुंबई : मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणावरुन विधानसभेत खडाजंगी पाहायला मिळाली. मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली.

विधानसभेत बोलताना फडणवीसांनी मनसुख हिरेन यांच्या पत्नीच्या जबाबाचा उल्लेख करत सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले. सचिन वाझे यांनीच मनसुख हिरेन यांची हत्या केली आणि मृतदेह खाडीत फेकल्याचा संशय हिरेन यांच्या पत्नीने व्यक्त केला, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. सचिन वाझे यांच्या विरोधात पुरावे असतानाही त्यांना अटक का होत नाही? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमल हिरेन यांच्या तक्रारीचा अर्ज वाचून दाखवला. देवेंद्र फडणवीस यांनी २०१७ मध्ये दाखल झालेल्या एफआयआरची आठवण करुन दिली. यामध्ये दोघा जणांनी ४० लाखांची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी दोन जणांना अटकपूर्व जामीन मिळाला आहे.

जामीन मिळालेल्यांमध्ये धनंजय विठ्ठल गावडे आणि सचिन वाझे यांचा समावेश आहे. हे दोघेही कोणत्या पक्षाचे आहेत, सर्वांना माहिती आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मनसुख हिरेन यांचं शेवटचं लोकेशन आहे ते धनंजय गावडे यांच्या घराजवळ होतं आणि त्यांच्या ४० किमीवर हिरेन यांचा मृतदेह सापडला. याप्रकरणात आणखी किती पुरावे हवे आहेत? असा सवाल फडणवीस यांनी विचारला.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!