उस्मानाबाद : कळंब तालुक्यातील मांजरा तसेच तेरणा नदी काठाच्या गावांचा आमदार राणाजगजितसिंह यांनी दौरा केला. यामध्ये काही ठिकाणी दुचाकीचा वापर तर काही ठिकाणी बैलगाडीचा वापर केला. इतकच नाही तर स्वत: ट्रॅक्टर चालवत आमदारांनी पुर परिस्थितीची पाहणी केली.
या वेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले की, ‘कृपया हताश होऊ नका.. गतवर्षीचा पिक विमा आणि यावर्षीचा हक्काचा पिक विमा देखील आपण राज्य सरकारकडून मिळवू, वेळप्रसंगी त्यासाठी एकत्रित आक्रमक पद्धतीने आंदोलन उभे करू… पण सर्वप्रथम प्रत्येक शेतकऱ्याने नुकसान झालेल्या क्षेत्राची ऑनलाईन नोंद करावी आणि ज्यांची ऑनलाईन नोंदणी होत नसेल त्यांनी ऑफलाईन अर्ज कृषी सहाय्यक किंवा तलाठी यांच्याकडे दाखल करावा व त्याची रितसर पोहच घ्यावी.’
सणासुदीच्या तोंडावर सरकारने शेतकऱ्यांना सरसकट पिक विमा व सरसकट नुकसान भरपाई जाहीर करावी अशी भूमिका घेणे माणुसकीचे ठरणार आहे. सरकारने शेतकऱ्यांप्रती संवेदनशील राहून लवकरात लवकर तातडीची मदत जाहीर करावी अन्यथा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आपण सरकारशी दोन हात करण्यास तयार आहोत, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला. मांजरा काठच्या गावात अनेक भागात नदीचे पाणी आल्याने तेथील शेतकऱ्यांचे व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले असून सणासुदीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकावून घेतला आहे. या सततच्या अतिवृष्टीने लाखो हेक्टरवरील सोयाबीन खराब झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असल्याचे ते म्हणाले.
नदीला आलेल्या पुरामुळे शेतीबरोबरच रस्त्यांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून रस्त्याच्या डागडुजीचे आणि दुरुस्तीच्या सूचना संबंधित विभागांना दिले आहेत. या पुरामुळे पूलांची देखील पडझड झाली असून तातडीने दुरुस्त करण्याच्या सूचना देखील संबंधित विभागांना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले. या दौऱ्यात त्यांनी कळंब तालुक्यातील भाटसांगवी, पाथर्डी, आथर्डी, आढळा, आडसुळवाडी, सात्रा, खोंदला, मोहा, शेळका धानोरा, दहिफळ व उस्मानाबाद तालुक्यातील रुई-ढोकी, ढोकी या गावातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली.
महत्त्वाच्या बातम्या
- ईडीनं मला चौकशीसाठी का बोलावलं आहे, हे मला देखील माहिती नाही – परब
- पुढच्या 10 निवडणुकांमध्ये धनंजय मुंडेंना कोणीही रोखू शकणार नाही; जयंत पाटलांचा आत्मविश्वास
- ‘दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए’; किरीट सोमय्यांचा कोल्हापूर प्रवेशाचा मार्ग मोकळा
- ‘कॉंग्रेसची सध्याची परिस्थिती पाहता मला पक्षाचे कोणतेही भविष्य दिसत नाही’
- दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्र झुकत नाही हे पवारसाहेबांनी दाखवून दिले होते – जयंत पाटील


