Share

पुढच्या 10 निवडणुकांमध्ये धनंजय मुंडेंना कोणीही रोखू शकणार नाही; जयंत पाटलांचा आत्मविश्वास

Published On: 

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसची परिसंवाद यात्रा सुरु आहे. यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बीडमध्ये हजेरी लावली. यावेळी जयंत पाटील यांचं परळीत जंगी स्वागत करण्यात आलं. या कार्यक्रमामध्ये बोलताना जयंत पाटील यांनी धनंजय मुंडे यांचं तोंडभरुन कौतुक केल्याचं पाहायला मिळालं आहे.

कोरोना होता म्हणून यात्रा थांबविली होती. आता कोरोना थोडाफार संपुष्टात आल्यावर यात्रा सुरू झाल्या. परळीत आल्यावर कोरोना संपुष्टात आल्याचे वाटले. माझ्या लग्नाची वरात निघाली नाही, मात्र परळीत वरात पाहिली. असंख्य तरुण धनंजय मुंडेवर प्रेम करतात हे मी आज परळीत पाहिले. हार घालण्याची पद्धत वेगळी होती, बघेल तिथं क्रेनने हार घातले. लोकांचे प्रेम पाहून दहा निवडणुकादेखील मुंडे यांची कोणी थांबवू शकत नाही. परळी फार पुढे जाण्याची शक्यता आहे, कारण जोर इथल्या नेत्यात आहे, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम मुंडे भविष्यकाळात करतील. एक विधानसभेची निवडणूक झाली म्हणजे काही नाही, जवळचे लोक दूर गेले की सर्व संपते, धनंजय मुंडेंवर नवी जबाबदारी मिळाली, मला अध्यक्षपदाची धुरा दिली त्यावेळी अनेकांनी पक्ष बदलला होता, मात्र दोन वर्षांपूर्वी जी स्थिती होती ती बदलली आहे, असल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं आहे. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि वैद्यनाथ कारखान्याचे व्हाईस चेअरमन नामदेव आघाव यांच्यासह 4 जणांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!