मुंबई – मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना आज ईडीनं चौकशीसाठी बोलावलं आहे. ईडीनं अनिल परब यांना पाठवलेलं हे दुसरं समन्स आहे. यापूर्वी 31 ऑगस्टला त्यांनी चौकशीसाठी उपस्थित राहावं, असं त्यांना समन्स बजावण्यात आलं होतं. पण त्यावेळी ते चौकशीसाठी उपस्थित राहिले नव्हते.
दरम्यान, आज आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी दोनदा समन्स बजावल्यानंतर अखेर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी स्वत: माध्यमांना माहिती दिली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माझ्या मुलीचं शपथ घेऊन मी मागेच सांगितलं होतं की मी काही चुकीचं केलेलं नाही. आताही तेच सांगत आहे. मी काहीच चुकीचं काम केलं नाही. मला दुसरं समन्स आल्याने मी ईडीच्या चौकशीला सामोरे जात आहे, असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितलं.
दरम्यान, दोन समन्स बजावण्यात आले असून अद्याप त्यांनी मला चौकशीसाठी का बोलावलं आहे, हे मला माहिती नाही असं सांगत चौकशीत माझी पूर्ण सहकार्य करण्याची भूमिका असेल, असं देखील ते म्हणाले. चौकशीत मला जे प्रश्न विचारले जातील, त्याची उत्तरं दिली जातील. मला अजूनही चौकशीसाठी का बोलावलं आहे हे मला माहिती नाही. पण चौकशीमध्ये पूर्ण सहकार्य ठेवण्याची माझी भूमिका असेल”, असं ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- गानसम्राज्ञी लता मंगेशकरांबाबत घडली होती भयानक घटना; जाणून घ्या
- पुढच्या 10 निवडणुकांमध्ये धनंजय मुंडेंना कोणीही रोखू शकणार नाही; जयंत पाटलांचा आत्मविश्वास
- ‘दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए’; किरीट सोमय्यांचा कोल्हापूर प्रवेशाचा मार्ग मोकळा
- ‘कॉंग्रेसची सध्याची परिस्थिती पाहता मला पक्षाचे कोणतेही भविष्य दिसत नाही’
- बसपाला हद्दपार करून उत्तर प्रदेशात रिपब्लिकन पक्षाचा निळा झेंडा फडकविणार – रामदास आठवले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

