Share

दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्र झुकत नाही हे पवारसाहेबांनी दाखवून दिले होते – जयंत पाटील

Published On: 

जालना – दोन वर्षापूर्वी शरद पवारसाहेबांना ईडीची नोटीस आली आणि आजच्या दिवशीच ईडीला आव्हान देत मीच येतो असा इशारा पवारसाहेबांनी दिला आणि राज्य व देशभरातील वातावरण ढवळून निघाले होते. या देशात सूडाचं राजकारण सुरू आहे हाच तो भाग होता. पवारसाहेबांचा त्या प्रकरणाशी संबंध नव्हता. जाणीवपूर्वक बदनामी करायची हे कुटील कारस्थान होते. दिल्लीच्या तख्ताने पवारसाहेबांना नमवण्याचा प्रयत्न केला परंतु दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्र झुकत नाही हे पवारसाहेबांनी दाखवून दिले. ही घटना लोकांच्या मनावर खोलवर बसली की आज महाराष्ट्राच्या सत्तेत आपण आहोत याची आठवण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी करुन दिली.

पवारसाहेबांच्या किमयेने व दूरदृष्टीने राज्यात सरकार स्थापन झाले आणि त्यात राजेश टोपे मंत्री झाले आणि आरोग्य मंत्री म्हणून त्यांना मंत्रीमंडळात स्थान मिळाले.देशात आरोग्याचे चांगले काम न केल्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना काढून टाकण्यात आले परंतु महाराष्ट्राचा हा आरोग्यमंत्री जगात कामाने मोठा झाला. मूर्ती लहान पण किर्ती महान असे राजेश टोपे यांचे काम आहे असे गौरवोद्गार जयंत पाटील यांनी काढले.

सरकार आल्यावर संघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांच्या कामांना प्राधान्य देता येतो. दिवस हे बदलत असतात. आज आपली सत्ता आली आहे. या नेत्यामुळे तुमचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे. त्यांच्या पाठीशी उभे रहा असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.पक्षाची मरगळ झटकून टाकावी या उद्देशाने ही परिवार संवाद प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काढली आहे. पायाला भिंगरी लावून २८८ मतदारसंघात जयंत पाटील जात आहेत आणि जाणार आहेत अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!