कोल्हापूर : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर शेकडो कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले आहेत. यानंतर, कोल्हापुरातील वातावरण तापलं असून सोमय्या यांना २० सप्टेंबर रोजी कोल्हापूरला न जाताच माघारी फिरायला लागलं होतं. मुश्रीफ यांच्यावर सोमय्या यांनी आरोप केल्यानंतर राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीतील नेत्यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
आता सोमय्या हे उद्या म्हणजेच २८ सप्टेंबर रोजी कोल्हापूरला जाणार आहेत. मुश्रीफ यांनी देखील सोमय्या यांना कोल्हापुरात येऊ द्यावं असं आवाहन कार्यकर्त्यांना केलं आहे. दरम्यान, सोमय्या हे आज मुंबईहून निघाले आहेत. सोमय्या यांनी २० सप्टेंबर रोजी जाण्याचे जाहीर केले असता जिल्ह्यातील वाढत तणाव लक्षात घेता कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना जिल्हाबंदीची नोटीस देत निर्बंध घातले होते.
यानंतर राजकीय नाट्य पाहायला मिळाले. सोमय्या मुंबईबाहेर जाऊ नयेत यासाठी त्यांच्या निवासस्थानाबाहेर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. तसेच, जेव्हा ते मुंबईतून कोल्हापूरला महालक्ष्मी एक्सप्रेसने येण्यासाठी सीएसएमटीवर आले तेव्हा देखील पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस अधिकारी आणि सोमय्या यांच्यात शाब्दिक चकमक देखील झाली. अखेर वादानंतर ऑर्डर न दाखवता आल्याने पोलिसांनी सोमय्या यांना रेल्वेत बसवले. यानंतर जिल्हाबंदी असल्याने त्यांना कराड येथे उतरवण्यात आले.
आता सोमय्या हे कोल्हापूरला जाणार असल्याने राजकीय क्षेत्राच्या नजरा त्यांच्या दौऱ्याकडे लागल्या आहेत. मुश्रीफ यांच्या आणखी दोन घोटाळ्यांचा पर्दाफाश करणार असल्याचे सोमय्या यांनी जाहीर केले आहे. सोमय्या हे आज पुण्यात येणार असून उद्या ते कोल्हापूरला जाणार आहेत. दरम्यान, आता कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सोमय्या यांच्या दौऱ्याला परवानगी दिल्याचे समोर आले आहे. त्यांच्यावरील जिल्हाबंदीचे निर्बंध देखील हटवण्यात आले आहेत.
दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए.
आखीर ठाकरे/पवारांना झुकावे लागले. माझ्यावरील कोल्हापूर जिल्हाबंदी मागे घ्यावी लागली @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil pic.twitter.com/X7ux9wB0MU
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) September 27, 2021
याबाबत सोमय्या यांनी एक ट्विट करून माहिती दिली आहे. तसेच, ठाकरे-पवार याच्यावर देखील त्यांनी निशाणा साधला आहे. ‘दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए. अखेर ठाकरे-पवारांना झुकावे लागले. माझ्यावरील कोल्हापूर जिल्हाबंदी मागे घ्यावी लागली,’ असं म्हणत सोमय्या यांनी त्ववेत सोबत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पत्र देखील जोडले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- प्राप्तिकर विभागाची मोठी कारवाई; महाराष्ट्रात विविध ठिकाणी छापे
- रावसाहेब दानवे ठेकेदाराला त्रास देत असल्याचे खुद्द मला नितीन गडकरी यांनीच सांगितले, खैरेंचा गौप्यस्फोट!
- भाजपने मनाचा मोठेपणा दाखवला; रजनी पाटील यांनी मानले भाजप नेत्यांचे आभार
- पहिला प्रयत्न वाया, आता अकरा कोळसा खाणींच्या लिलावासाठी आता दुसऱ्या प्रयत्नाची प्रक्रिया सुरु
- करुणा शर्मा प्रकरणावरून पंकजांची धनंजय मुंडेंवर पुन्हा टीका; ‘एट्रॉसिटी हा दलितांसाठी कवच कुंडल, पण..’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

