पणजी – गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुईझिन्हो फालेरो यांनी सोमवारी राज्य विधानसभा सदस्यत्वाचा आणि काँग्रेसचा राजीनामा दिला.कॉंग्रेस पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. काल राजीनामा दिल्यानंतर त्यांनी टाकलेल्या लेटर बॉम्बची सध्या मोठी चर्चा होताना दिसत आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिलेल्या राजीनामा पत्रात त्यांनी सध्याची परिस्थिती पाहता मला पक्षाचे कोणतेही भविष्य दिसत नाही असे म्हटले आहे.
राजीनाम्यानंतर आपल्या समर्थकांशी बोलतान त्यांनी मी काँग्रेसमध्ये त्रस्त होतो. मला गोव्याचा हा त्रास संपवायचा आहे. जर माझं दुःख इतकं असेल काँग्रेससाठी मतदान करणाऱ्या गोव्यातील नागरिकांच्या दुर्दशेची कल्पना करा असे म्हटले होते.दरम्यान,या पत्रामध्ये त्यांनी काँग्रेससोबतच्या ४० वर्षाच्या प्रवासाबाबत आठवणी जागवल्या आहेत.
Former Goa Chief Minister and MLA Luizinho Faleiro in his resignation letter to Congress interim president Sonia Gandhi writes, "I see absolutely no hope or even the will to prevent the collapse of the party and change for the better". pic.twitter.com/BU15Fz8GRq
— ANI (@ANI) September 27, 2021
त्यांनी पक्षासाठी केलेल्या कामाचाही उल्लेख केला. पत्रात फालेरो यांनी गोवा काँग्रेसवरही प्रश्न उपस्थित केले. पक्षातील भांडणांवर प्रश्न विचारत, मला पक्षाने वारंवार निराश केले आहे असे फालेरो यांनी म्हटले आहे. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत १७ जागा जिंकल्या. आम्हाला अपक्ष आमदारांचाही पाठिंबा होता, पण आमच्या मतभेदांमुळे भाजपाला बहुमत सिद्ध करता आले आणि आम्ही जनतेला निराश केले. या साडेचार वर्षांत मी पक्षाला एकत्र आणण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी हायकमांडचे दुर्लक्ष झाले, असे फालेरो यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- गानसम्राज्ञी लता मंगेशकरांबाबत घडली होती भयानक घटना; जाणून घ्या
- पुढच्या 10 निवडणुकांमध्ये धनंजय मुंडेंना कोणीही रोखू शकणार नाही; जयंत पाटलांचा आत्मविश्वास
- ‘दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए’; किरीट सोमय्यांचा कोल्हापूर प्रवेशाचा मार्ग मोकळा
- पहिला प्रयत्न वाया, आता अकरा कोळसा खाणींच्या लिलावासाठी आता दुसऱ्या प्रयत्नाची प्रक्रिया सुरु
- बसपाला हद्दपार करून उत्तर प्रदेशात रिपब्लिकन पक्षाचा निळा झेंडा फडकविणार – रामदास आठवले


