Share

बडे राजकीय पक्ष धार्मिक भावना भडकविण्याचे टेंडर छोट्या पक्षांना देत आहेत- नाना पटोले

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्यात मशिदीसमोर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा वाजवण्याची भूमिका  घेतली होती. याला भाजपनेही पाठींबा दर्शवला आहे. तर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठन करण्याचा इशारा दिला होता. याप्रकरणी सध्या राणा दाम्पत्य जेल मध्ये आहेत. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवरच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी ट्वीट करत विरोधी पक्षावर निशाणा साधला आहे.

“राजकारणात सध्या एक नवा ट्रेंड सुरु झाला आहे. उन्मादाचा फायदा उठवता यावा म्हणून बडे राजकीय पक्ष धार्मिक भावना भडकविण्याचे टेंडर छोट्या पक्षांना देत आहेत.”, असा टोला नाना पटोले यांनी ट्वीट करत लगावला आहे.

दरम्यान कालच भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला. यात ते किरकोळ जखमीही झाले आहेत. या प्रकरणीच सोमय्या आणि भाजप नेत्यांचे मंडळ केंद्रीय गृहसचिवांची भेट घेण्यासाठी दिल्ली गेले आहेत. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनीही केंद्रीय गृहसचिवांना पत्र लिहिले आहे. त्यामुळे भाजपने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असल्याचे कारण देत राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे. यामुळे राज्यातील राजकीय संघर्ष अधिकच पेटताना दिसून येत आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!