Share

Ramesh Deo: माधुरी दीक्षित, महेश मांजरेकरसह सेलिब्रिटींनी दिला आठवणींना उजाळा, सोशल मीडियावर वाहिली श्रद्धांजली

Published On: 

मुंबई : जेष्ठ अभिनेते रमेश देव यांचे बुधवार, २ फेब्रुवारी रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 93 वर्षांचे होते. अभिनेते रमेश देव यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले होते. मात्र रमेश देव यांच्या निधनाने सिनेसृष्टीची कधी ही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या जाण्याने सर्वत्र दु:ख व्यक्त केलं जात असून सोशल मीडियावर माधुरी दीक्षित, महेश मांजरेकर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी श्रध्दांजली वाहिली आहे.

दरम्यान अनेक अभिनेते, राजकारण्यांनी देखील सोशल मीडियावर दिवंगत अभिनेते रमेश देव यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच प्रसिध्द अभिनेत्री माधुरी दीक्षितने (Madhuri Dixit) ट्विटरवर आपले दुःख व्यक्त केले. “सदाबहार व्यक्तिमत्वाची बातमी ऐकून दुःख झाले, श्री. रमेश देव जी. कुटुंबियांना शोक व्यक्त करतो. #RIP #RameshDeo सर, तिने लिहिले. त्याचप्रमाणे अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांनी देखील शोक व्यक्त केला असून मराठी चित्रपटसृष्टीतील सदाबहार व्यक्तिमत्व, महान श्री रमेश देव जी यांचे अचानक निधन झाल्याबद्दल ऐकून वाईट वाटले. #OmShanti कुटुंबाप्रती मनापासून संवेदना, असं उर्मिला म्हणाली.

तसेच चित्रपट निर्माते महेश मांजरेकर (Filmmaker Mahesh Manjrekar) यांनी रमेश देव यांची नुकतीच भेट घेतल्याची आठवण करून  देत देव यांनी गंमतीने त्यांना त्यांच्या चित्रपटात भूमिका देण्यास सांगितल्याची आठवण सांगितली. अन् काल देखील आम्ही त्याच्याबद्दल बोलत होतो की तो या वयात इतका उत्साही आहे कारण त्याने काही दिवसांपूर्वी आपला वाढदिवस साजरा केला होता,” मांजरेकर यांनी नुकतंच सांगितले.

चित्रपट निर्माते मधुर भांडारकर (Filmmaker Madhur Bhandarkar) यांनीही ट्विटरवर रमेश देवसोबत एक थ्रोबॅक चित्र टाकले आणि त्यांच्या निधनाने एका युगाचा अंत झाल्याचे नमूद केले. “ज्येष्ठ अभिनेते # रमेशदेवजी यांच्या निधनाने दुःख झाले. एका युगाचा शेवट, भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांचे योगदान खूप मोठे आहे, मराठी आणि हिंदी चित्रपटांमधील त्यांच्या संस्मरणीय कामगिरीसाठी ते नेहमीच स्मरणात राहतील. त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांच्या मनःपूर्वक संवेदना. #OmShanti त्यांनी लिहिलंय.

तसेच प्रफुल्ल पटेल, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनीही या रमेश देव यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. रमेश देव यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार असून सर्वच स्तरातून त्यांना सांत्वना देण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!