मुंबई: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (West Bengal Chief Minister Mamata Banerjee)यांना मुंबई भाजपचे सचिव अॅड विवेकानंद गुप्ता (BJP Secretary Adv Vivekananda Gupta) यांनी केलेल्या तक्रारी वरून मुंबई महानगर दंडाधिकाऱ्यांनी समन्स बजावले असून २ मार्च २०२२ रोजी न्यायालयासमोर उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
१ डिसेंबर २०२१ रोजी यशवंतराव प्रतिष्ठान येथे प्रख्यात गीतकार जावेद अख्तर यांनी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला ममता बॅनर्जी उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अखेरीला राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर बॅनर्जी यांनी राष्ट्रगीताच्या सुरुवातीच्या दोन ओळी बसून म्हटल्या आणि नंतरच्या दोन ओळी उभे राहून म्हटल्या.एवढेच नाही तर राष्ट्रगीत सुरू असतानाच त्या तिथून निघून गेल्या. ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रगीताचा अपमान केल्याने भाजपचे सचिव अॅड विवेकानंद गुप्ता यांनी तक्रार दाखल केली होती.
१ डिसेंबर २०२१ रोजी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलेल्या राष्ट्रगीताचा अवमाना विरोधात भाजपा मुंबईचे सचिव @vivekanandg यांनी केलेल्या तक्रारीनंतर मुंबई महानगर दंडाधकाऱ्यांनी ममता बॅनर्जी यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले. pic.twitter.com/0LnAAWzPFR
— BJP Mumbai (@BJP4Mumbai) February 3, 2022
दरम्यान याप्रकरणी विवेकानंद गुप्ता यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार मुंबई महानगर दंडाधिकाऱ्यांनी ममता बॅनर्जी यांना २ मार्च २०२२ रोजी न्यायालयासमोर उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- U19WC: ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवत भारत फायनलमध्ये प्रवेश
- काँग्रेस नेते अमित देशमुख कोरोना पॉझिटीव्ह
- “एकाच्या खिशात भरभरून कोंबायचे आणि…”, केंद्रीय अर्थसंकल्पाहून संजय राऊतांची टीका
- परमबीर सिंहांचा धक्कादायक खुलासा; म्हणाले, “वाझेला खात्यात घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांसह…”
- “…तर मानसिक संतुलन बिघडतं”, नवाब मलिकांच्या टीकेवर मोहित कंबोज यांचे प्रत्युत्तर


