Share

नितेश राणेंच्या अटकेनंतरचा ‘तो’ फोटो व्हायरल, जाणून घ्या काय आहे या फोटो मागचे सत्य

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा बँक बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत(Satish Sawant) यांचे प्रचार प्रमुख संतोष परब यांच्यावरील जीवघेण्या हल्ल्यासंबंधी जामीन अर्ज माननीय सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला होता. १८ डिसेंबर २०२१ रोजी संतोष परब (Santosh Parab) यांच्यावर कणकवली येथे हल्ला झाला होता. याप्रकरणी आमदार नितेश राणे(Nitesh Rane) यांना दोन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. नितेश यांना कणकवली पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांना सावंतवाडी पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले. त्यानंतर नितेश यांचा तुरुंगात पुस्तक वाचतानाचा एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचे बघायला मिळाले. परंतु तद्पश्चात आता या फोटोमागचे वेगळेच सत्य समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार नितेश राणेंचा हा फोटो साधारणपणे पाच वर्षांपूर्वीचा असल्याचे समोर आले आहे. त्यावेळी नितेश राणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात वाळू प्रश्नावर राडा केला होता. त्याप्रकरणी त्यांना पाच वर्षांपूर्वी अटक करण्यात आली होती. परंतु आता त्यांना पुन्हा एकदा अटक झाल्यानंतर त्यांचा हा जुना फोटो व्हायरल होत आहे.

दरम्यान, नितेश राणे यांच्या वकिलाने सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. तो फेटाळण्यात आल्याने नितेश राणे अज्ञातवासात गेले होते. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज करण्यात आला आणि तोही फेटाळण्यात आला आहे. तद्पश्चात सुप्रीम कोर्टाने देखील नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. शेवटी राणेंनी त्यांचा उच्च न्यायालयातील जामीन अर्ज ही मागे घेतला आहे. यावर प्रकरणावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले होते की, नितेश राणे यांनी कोर्टात शरणागतीचा कोणताही अर्ज केलेला नाही. जोपर्यंत शरण येत नाहीत तोपर्यंत जामीन अर्जासाठी पात्र होता येत नाही. जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत जामीन मिळत नाही, असं परब म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!