🕒 1 min read
नवी दिल्ली: माजी गृहमंत्री अनिल देशमुख(former Home Minister Anil Deshmukh) यांच्यावर १०० कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मोठा खुलासा केला आहे. (Shocking revelation of Parambir Singh) वाझेला खात्यात घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांसह दोन मंत्र्यांचा दबाव असल्याचा आरोप त्यांनी ईडीच्या जबाबात केला आहे. यावरच शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“परमबीर सिंह एक आरोपी आहेत. त्यांच्यावर खंडणीचे आरोप आहेत. तसेच गुन्हे अपहरणापर्यंत असे अनेक आरोप त्यांच्यावर आहेत. कदाचित मनसुख हिरेन प्रकरणात त्यांच्यावर कोणते आरोप लावले ते माहित नाही, पण आरोपी आपल्या बचावासाठी असे आरोप करत असतो. अशी नावे घेत असतो. आम्हीही प्रधानमंत्र्यांचे नावे घेतो, अनेक मुख्यमंत्र्यांचे नावे घेतली जातात. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांचीही नावे घेतली जात होती. विरोधी पक्षाने त्याचे भांडवल करायचे ठरवले असेल तर, त्यांनी करत राहावे. कोण कोणाचे नाव घेत आहे, यावर परसेप्शन ठरत नाही”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.
दरम्यान सचिन वाझे यांना पोलीस दलात घेण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे(Environment Minister Aditya Thackeray) यांनी दबाव टाकला असल्याचे परमबीर सिंह यांनी म्हटले आहे. तसेच पोलीस खात्यात परतण्यासाठी अनिल देशमुख यांनी आपल्याकडे दोन कोटींची मागणी केल्याचेही परमबीर सिंह यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ममता बॅनर्जीना मोठा धक्का! राष्ट्रगीत अवमाना विरोधात भाजपने केलेल्या तक्रारीनंतर न्यायालयात राहावे लागणार हजर
- समीर वानखेडेंना धक्का, संजय राऊतांच्या व्याह्यांकडून नवी मुंबईतील सद्गुरु बारचा परवाना रद्द
- U19WC: ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवत भारताचा फायनलमध्ये प्रवेश
- काँग्रेस नेते अमित देशमुख कोरोना पॉझिटीव्ह
- “एकाच्या खिशात भरभरून कोंबायचे आणि…”, केंद्रीय अर्थसंकल्पाहून संजय राऊतांची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
