🕒 1 min read
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी नेहमीच वेगवेगळ्या लूकमध्ये दिसत असतो. ज्यात कधी तो केसांची स्टाईल बदलतो तर कधी वेगेवेगळ्या प्रकारच्या जाहिरातींमध्ये दिसत असतो. सद्या माही आयपीएल मेगा ऑक्शनसाठी बँगलोर मध्ये आहे. मात्र त्याचा एक नवीन लूक मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
” अथर्व द ओरिजिनल ” या ग्राफिक सीरिजच्या पात्राला माहीचा लूक देण्यात आला आहे. रमेश थमिलमनी यांच्या कथेवर आधारित आहे ज्याला धोनी एन्टरटेन्मेंट सपोर्ट केले आहे.रिलीज झालेल्या फर्स्ट लूक क्लिपमध्ये धोनी युद्धभूमीवर अॅनिमेटेड अवतारात दिसत आहे. यामध्ये त्याचा अवतार राक्षसासारख्या सेनेशी लढत असल्याचा दिसत आहे. माहीच्या या ‘न्यू एज ग्राफिक नॉव्हेल’ची घोषणा २०२० साली करण्यात आली होती, जी एका नवोदित लेखकाच्या अप्रकाशित पुस्तकाच्या स्वरूपात असेल. धोनी एंटरटेनमेंटच्या व्यवस्थापकीय संचालक असलेल्या धोनीची पत्नी साक्षी हिने या मालिकेच्या निर्मितीबद्दल सांगताना हि एक थरारक मालिका असल्याचे सांगितले.
#MSDhoni will be soon seen in a graphic new age novel #AtharvaTheOrigin. It gives @msdhoni fans and comic lovers a reason to rejoice. pic.twitter.com/kf8OTrAHl5
— Sreedhar Pillai (@sri50) February 2, 2022
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर महेंद्र सिंग धोनी नवीन मार्ग शोधत असल्याचे दिसते आहे. हि ऍनिमेटेड सिरीज ‘अथर्व’ त्यापैकी एक आहे. माहीचा हा नवीन लूक चाहत्यांना खूप भावात आहे. क्रिकेट नंतर आता मनोरंजन क्षेत्रातही आपले नाव करण्यासाठी माही उत्सुक दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या
- ममता बॅनर्जीना मोठा धक्का! राष्ट्रगीत अवमाना विरोधात भाजपने केलेल्या तक्रारीनंतर न्यायालयात राहावे लागणार हजर
- समीर वानखेडेंना धक्का, संजय राऊतांच्या व्याह्यांकडून नवी मुंबईतील सद्गुरु बारचा परवाना रद्द
- U19WC: ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवत भारताचा फायनलमध्ये प्रवेश
- काँग्रेस नेते अमित देशमुख कोरोना पॉझिटीव्ह
- “एकाच्या खिशात भरभरून कोंबायचे आणि…”, केंद्रीय अर्थसंकल्पाहून संजय राऊतांची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
