Share

“शिखरला ७.५ करोड पेक्षा कमीत निवडले गेले तर आश्चर्य होईल” माजी क्रिकेटरचे मोठे वक्तव्य

Published On: 

मुंबई: आयपीएलचे मेगा ऑक्शन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. यंदा ऑक्शन मध्ये मोठं मोठ्या नाव असणार आहेत. त्यामुळे कोणत्या खेळाडूला किती पैस्यात खरेदी केले जाईल याचीही चर्चा सुरु झाली आहे. यात नुकतेच ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडू ब्रॅड हॉगने शिखर धवन बाबत मोठे वक्तव्य केले आहे. ब्रँडचे म्हणणे आहे कि शिखराला ७.५ करोडपेक्षा जास्त किमतीत निवडले जाईल.

ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू ब्रॅड हॉग म्हणाला की “भारताचा अनुभवी सलामीवीर शिखर धवनला आगामी आयपीएल २०२२ मेगा ऑक्शनमध्ये कमी बोली लागल्यास आश्चर्य वाटेल. स्पर्धेत प्रत्येक संघाला एक विश्वास असणारा खेळाडू हवा आहे आणि शिखरने स्वतःला सिद्ध केले आहे. त्यामुळे जर शिखराला कोणी ७.५ करोड पेक्षा कमी किमतीत खरेदी केली तर मला आश्चर्य वाटेल”

शिखर धवनने तीन वर्ष दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळले आहे. तसेच आयपीएलच्या इतिहासात बॅक टू बॅक शतके झळकावणारा तो पहिला फलंदाज आहे. २०२०च्या दुबई इथे झालेल्या हंगामात त्याने हा पराक्रम केला होता. मेगा ऑक्शन साठी शिखर धवनची बेस प्राईस २ करोड रुपये इतकी आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!