मुंबई : राज्यातील सत्ता गमावल्यांनंतर दिवसेंदिवस सेनेला धक्क्यांवर धक्के बसत आहेत. काल माजी विरोधी पक्षनेते आणि मंत्री रामदास कदम यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला. रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी राजीनामा पाठवला. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना कदम यांना अश्रू अनावर झाले. तसेच शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या बोलण्यावर त्यांनी आक्षेप नोंदवला.
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेल्या आमदारांवर किती टीका केली गेली, खालच्या पातळीवर जाऊन बोललं गेलं. त्या आदित्यचं वय काय आणि तो कोणत्या भाषेत आमदारांना बोलतोय? याचं जरा भान ठेवा”, असे म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच “माझं वय 70 आहे. तरी मला आदित्य ठाकरेंना साहेब म्हणावं लागतं. कारण ते ठाकरे आहेत, आदित्य ठाकरे हे ‘मातोश्री’मधले आहेत. अन्य कोणत्याही मंत्र्यांनी कसंही बोललं तरी चालतं. पण, आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांना असं बोलायला नको होतं”, असे म्हणत रामदास कदम भावुक झालेले पाहायला मिळाले.
रामदास कदम यांची पक्षातून हकालपट्टी केल्यासंदर्भात विचारले असता, “जेव्हा नारायण राणे, राज ठाकरे आणि छगन भुजबळांनी शिवसेना सोडली तेव्हा मीच संघर्ष केला आणि आज तुम्ही माझीच हकालपट्टी करत आहात. अहो, तुम्ही हकालपट्टी करण्याआधीच मी माझा राजीनामा दिला आहे. त्यामुळे तुम्ही काय मला काढून टाकणार”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या:
- Sanjay Raut | “आंधी नही, तुफान है मोदी…”; संजय राऊतांचा व्हिडीओ व्हायरल
- Ramdas Kadam : आदित्य ठाकरेंना या वयात ‘साहेब’ म्हणावं लागतंय; रामदास कदम यांनी व्यक्त केली खंत
- Sanjay Raut |”नशेची,सत्तेची,बेईमानीची भांग पिणारे उद्या मातोश्री…” ; संजय राऊत शिंदे गटावर संतापले
- Sanjay Raut PC : “नशेची, सत्तेची, बेईमानीची भांग पिणारे उद्या मातोश्री…”; संजय राऊत शिंदे गटावर संतापले
- Uddhav Thackeray vs Eknath Shinde | उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा झटका! आज खासदार शिंदे गटात सामील होणार?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

