Share

Ramdas Kadam : “मी शिंदे-ठाकरेंना एकत्र आणणार, अखेरपर्यंत भगवाच धरणार”; रामदास कदमांना आश्रू अनावर

Published On: 

🕒 1 min read

Ramdas kadam । मुंबई : काल माजी विरोधी पक्षनेते आणि मंत्री रामदास कदम यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला. तर आज त्यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना आपल्या मनातील भावना बोलून दाखवल्या. यावेळी ते म्हणाले कि ‘शिवसेनेत आम्ही 52 वर्ष घालवली. तुम्ही भीक दिली असं कसं म्हणू शकतात. आम्ही शिवसेनेसाठी सर्वकाही केलं. उद्धवजी का तुम्ही शरद पवार, सोनिया गांधी यांना सोडत नाहीत,’ असा सवाल करताना कदम यांना आश्रू अनावर झाले. यावेळी बोलताना सतत त्यांच्या डोळ्यातून आश्रू येत होते.

मागच्या 52 वर्षांत शिवसेनेसाठी केलेल्या प्रत्येक गोष्टींची त्यांनी यावेळी माहिती दिले. तरीही उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना एकत्र आणण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचं रामदास कदम यावेळी म्हणालेत. तसेच पुढे त्यांनी माझी हकालपट्टी केली तरी मी शिवसैनिक आहे. बाळासाहेब ठाकरेंचा मावळा आहे. मी मरेपर्यंत हाती भगवाच धरणार, अशा शब्दात रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना संबोधले आहे.

दरम्यान, यावेळी कदम असंही म्हणाले की, माझं वय 70 आहे. तरी मला आदित्य ठाकरेंना साहेब म्हणावं लागतं. कारण ते ठाकरे आहेत, आदित्य ठाकरे हे ‘मातोश्री’मधले आहेत. पण, अन्य कोणत्याही मंत्र्यांनी कसंही बोललं तरी चालतं. पण, आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांना असं बोलायला नको होतं, असंही रामदास कदम यावेळी म्हणालेत. यावेळी वारंवार त्यांच्या डोळ्यातून आश्रू येत होते.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!