मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बारामती दौऱ्यावर येणार आहेत. आगामी निवडणुका लक्षात घेऊन भाजपकडून त्यांचा हा दौरा आखण्यात आल्याचं बोललं जात आहे. त्यावरच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र काबीज करायला आलेल्या औरंगजेबाची समाधी महाराष्ट्रातच आहे, हे दिल्लीश्वरांनी लक्षात घ्यावं, असं ते म्हणाले.
“बारामतीचा बुरुज ढासळण्यासाठी दिल्लीवरून मोदी-शहा आले परंतु आमचा बुरुज ढासळू शकले नाहीत. ज्यावेळी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला डिवचण्याचा प्रयत्न दिल्लीश्वरांनी केला तेव्हा त्यांना त्याच पद्धतीने प्रत्युत्तर देण्यात आलंय. असंच स्वप्न घेऊन महाराष्ट्र काबीज करायला आलेल्या औरंगजेबाची समाधी महाराष्ट्रातच आहे, हे दिल्लीश्वरांनी लक्षात घ्यावं. त्यामुळे आमच्या स्वाभिमानाला डिवचण्याचा प्रयत्न केलात तर तुमचा योग्य तो पाहुणचार करून परत पाठवण्याची व्यवस्था बारामतीची आणि महाराष्ट्राची जनता नक्की करेल.”, असा इशाराच सुरज चव्हाण यांनी यावेळी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- MNS on Governor| राज्यपालांनी वादग्रस्त विधान करून आपल्या बुध्दीमत्तेची कुवत सिद्ध केली – हेमंत संभूस
- Devendra Fadnavis । मंत्री मंडळाचा विस्तार लवकरच होईल; देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
- Eknath Shinde | भंडाऱ्याच्या बाबतीत घडलेली घटना दुर्दैवी आहे – एकनाथ शिंदे
- Shahajibapu Patil : उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी मैत्रीभावनेने एकत्रं यावं; शहाजीबापूंचं आवाहन
- Tiranga Campaign | दिल्लीतील महाराष्ट्र सदनात राज्यपालांच्या हस्ते हर घर तिरंगा मोहीमेचं उद्घाटन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

