Share

Uddhav Thackeray : बाळासाहेबांना दिलेले वचन अजूनही अपूर्ण!, उद्धव ठाकरे मुलाखतीत असे का म्हणाले?

Published On: 

मुंबई : संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. शिवसेना-भाजप युती तुटल्याबद्दलही ते उघडपणे बोलले. त्याचं एक स्वप्न अजूनही अपूर्ण असल्याचंही त्यांनी सांगितलं. उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही 25-30 वर्षे त्यांच्यासोबत भाजपसोबत आहोत. तरीही त्यांनी 2014 मध्ये युती तोडली. कारण काहीच नव्हते. तेव्हाही आम्ही हिंदुत्व सोडले नाही आणि आजही सोडले नाही. भाजपने शेवटच्या क्षणी शिवसेनेसोबतची युती तोडली होती. तेव्हाही आम्ही त्याचे मित्र होतो.

मी अडीच वर्षे शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद का मागत होतो? ते मुख्यमंत्रीपद माझ्यासाठी नव्हते. त्यामुळे त्यावेळी ती देण्यात आली नाही. यावेळीही मी अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद का मागितले, कारण त्या काळात मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवून देईन, असे वचन शिवसेनाप्रमुखांना दिले होते. तसे माझे ते शब्द आजही अपूर्णच आहेत. कारण मी मुख्यमंत्री होणार, असे मी म्हटले नव्हते. मला मुख्यमंत्रीपद हे आव्हान म्हणून स्वीकारावे लागले. कारण सर्व गोष्टी ठरल्यानंतर त्याला भाजपने नाकारले होते. म्हणूनच मला ते करावे लागले.

मुलाखतीत आज बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपला सावध राहण्याचे आवाहन केले आहे. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “प्रत्येकाच्या पापाचा घडा भरत असतो. त्यामुळे उद्या हे स्वतःला नरेंद्र मोदी समजतील आणि पंतप्रधान पदावरही स्वतःचा दावा सांगतील, त्यामुळे भाजपवाल्यांनी सावध राहावे.”

त्याचबरोबर त्यांनी बंडखोर आमदारांवरही कडाडून टीका केली आहे.”भाजपसोबत जेव्हा सत्तेत होतो तेव्हा यांना भाजपकडून अन्याय होत होतं. तेव्हा सांगितले जात होते की भाजपा शिवसेनेला गावागावात काम करू देत नाही. भाजपा शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करत आहे असे म्हटले जात होते. आता तेच म्हणतायेत की राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यामुळे शिवसेनेची कामे होत नाहीत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपनेच शिवसेनेसोबत दगा दिला. त्यामुळे महाविकास आघाडीला जन्म द्यावा लागला. आता यांना आणखीच नवीन काहीतरी कारणे सुचत आहेत”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!