🕒 1 min read
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांची भेट घेतली. या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. टाटा यांची सदिच्छा भेट घेतल्याचे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
एकनाथ शिंदे यांनी रटन टाटा यांची त्यांच्या कुलाब्यातील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी एकनाथ शिंदे आणि रतन टाटा यांच्यामध्ये 45 मिनिटे चर्चा झाली. यावेळी रतन टाट यांनी मुख्यमंत्री झाल्याबद्दल एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले, तसेच पुढील कार्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या. मी रतन टाटा यांची सदिच्छा भेट घेतली, त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. दरम्यान यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळातील निर्णयांना देण्यात येणाऱ्या स्थगितीबाबत देखील प्रतिक्रिया दिली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- महाराष्ट्र सुपर मॉडेलचा महाअंतिम सोहळा संपन्न
- डिळी कादंबरीत गावखेडे आणि निमशहरी जगण्याची प्रगल्भ मांडणी – रंगनाथ पठारे
- Deepali Sayed | “रुसलेल्या, चुकलेल्या सैनिकांना माफ करा” ; दीपाली सय्यद यांची उद्धव ठाकरेंना विनंती
- Sanjay Raut : “ये दोस्ती….हम नही तोडेंगे”, संजय राऊतांच्या उध्दव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा
- Sanjay Raut | बाळासाहेब ठाकरे यांनी माकडांची माणसे केली – संजय राऊत


