मुंबई : एकनाथ शिंदे यांनी राज्यात भाजपसोबत सरकार स्थापन केल्यापासून, शिवसेना पक्ष पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांचा ठाकरे गट आणि एकनाथ शिंदेंचा शिंदे गट, असे दोन गट पाहायला मिळत आहे. एवढंच नाहीतर दोन्ही गटातील नेते एकमेकांवर आरोप, टीकेबाजीही करतायेत. ठाकरे गटातील नेते भास्कर जाधव यांनी शिंदे गटातील नेते रामदास कदम यांच्यावर रामदास कदम यांना वेड्याच्या रुग्णालयात दाखल केलं पाहिजे, असं म्हणत हल्ला केला होता. अशातच रामदास कदम यांनी जाधवांना चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे.
काय म्हणाले रामदास कदम ?
भास्कर जाधवांना येडा झालेला कुत्रा चावला आहे. त्यांचा मेंदू सडलेला आहे. नासक्या डोक्यातून नासके विचार येतात, असं म्हणत रामदास कदम यांनी भास्कर जाधव यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. कदमांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले, भास्कर जाधवांनी बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून राष्ट्रवादीत प्रवेश केला. परत, शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसून शिवसेनेत आले. उद्धव ठाकरेंना खूश करण्यासाठी हे बाटगे पणा दाखवत आहेत.
तसेच, कदमांना दसरा मेळाव्याबाबत विचारण्यात आले. त्यावर शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला शिवसैनिक स्वत: येतील. त्यामुळे शिवसेना कोणाची याचा निर्णय न्यायालयाच्या आधी पाच तारखेला होणाऱ्या दसरा मेळाव्याला लागेल, असं त्यांनी म्हटलं.
महत्वाच्या बातम्या :
- Pankaja Munde | “पंकजा मुंडेंना मंत्रीमंडळात घ्यावं…”, बहिणीसाठी बहिणीची धाव
- Ambadas Danve । “… पण तुमच्या मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी हे करावेच लागेल”; दानवेंचा शिंदेंना सल्ला
- Ajit Pawar | “एक जिल्हा माझ्याकडे होता तेव्हा मला नाकीनऊ येत होतं, आता फडणवीसांकडे सहा जिल्हे म्हटल्यावर…” अजित पवार
- Ajit Pawar | “मी पण आईला भेटतो पण फोटो काढत नाही”, अजित पवारांचा नरेंद्र मोदींना टोला
- MNS । ‘त्या’ रिकाम्या खुर्चीवर ते राऊतांच्या चपलाही ठेवतील; मनसे नेत्याकडून शिवसेनेचा समाचार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

