Share

MNS । ‘त्या’ रिकाम्या खुर्चीवर ते राऊतांच्या चपलाही ठेवतील; मनसे नेत्याकडून शिवसेनेचा समाचार

Published On: 

मुंबई : गेल्या आठवड्यात शिवसेनेच्या वतीने नेस्को सभागृहात कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी भाषण करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर चांगलाच हल्लाबोल केला. तसेच यावेळी व्यासपिठावर शिवसेना नेते संजय राऊत यांची जागा मोकळी होती. याच मुद्यावरून मनसेने जोरदार टीका केली आहे.

मनसे नेते प्रकाश महाजन यांनी यावरून सेनेवर निशाणा साधलाय. महाजन म्हणाले कि, बाळासाहेबांची खुर्ची रिकामी ठेवण्याऐवजी त्यांनी संजय राऊतांची खुर्ची ठेवली. येणाऱ्या काळात ते त्याच रिकाम्या खुर्चीवर संजय राऊतांच्या चपलाही ठेवतील. राऊत वाकले तर उद्धव ठाकरेंना अनेकांसमोर वाकावे लागेल, त्यामुळेच राऊतांची खुर्ची रिकामी ठेवली, अशी टीका प्रकाश महाजन यांनी केली.

दरम्यान, याआधी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी देखील जोरदार टोला लगावला होता. देशपांडे यांनी ट्विट करत टीका केली होती. ट्विटमध्ये त म्हणाले कि, आज संजय राऊतांची खुर्ची रिकामी होती उद्या तुमची पण खुर्ची रिकामी ठेवावी लागेल तयारी ठेवा, असं म्हणत संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!