Share

Ajit Pawar | “एक जिल्हा माझ्याकडे होता तेव्हा मला नाकीनऊ येत होतं, आता फडणवीसांकडे सहा जिल्हे म्हटल्यावर…” अजित पवार

Published On: 

🕒 1 min read

बारामती : बारामती तालुका सहकारी खरेदी- विक्री संघाची 59 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडली. या सभेला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हजेरी लावली. यावेळी अजित पवारांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. त्यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

अजित पवार यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोलाः

शिंदे सरकार, तुम्हाला संधी मिळाली आहे, कशी मिळालीय, गद्दारी केली की नाही मला माहीत नाही, पण तुम्ही जनतेची कामे करा ना आता. पालकमंत्री नेमलेत, कुणाला एक जिल्हा, कुणाला दोन जिल्हे दिले, पण फडणवीसांना 6 जिल्हे दिलेत. एक जिल्हा माझ्याकडे होता तेव्हा मला नाकीनऊ येत होतं, आता सहा जिल्हे म्हटल्यावर काय होणार काय माहीत. आता त्यांनी जनतेची कामे करावीत. पण तरीही देवेंद्र फडणवीस यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असा खोचक टोला अजित पवार यांनी लगावला आहे.

नरेंद्र मोदी यांच्यावर देखील साधला निशाणाः

यादरम्यान अजित पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देखील निशाणा साधला. अनेक वेळा कामातून वेळ काढून नरेंद्र मोदी त्यांच्या आईला भेटायला जातात. यावेळी त्यांचा आणि त्यांच्या आईचा फोटो देखील व्हायरल होत राहतात. यावरूनच अजित पवारांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टोला लगावला आहे.

मी पण बारामती मध्ये येतो आईला भेटतो, मी कधी फोटो काढला नाही, असं अजित पवार यांनी यावेळी म्हटलं आहे. आताही सभा संपल्यानंतर आईला भेटायला जाणार असून फोटो काढणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!