Share

Rohit Pawar : ठाकरे सरकारच्या ‘त्या’ निर्णयाची स्थगिती उठवा; रोहित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: माझ्या मतदारसंघातील पक्षकारांची ‘तारीख पे तारीख’ या त्रासातून सुटका व्हावी आणि वकीलांचीही सोय व्हावी म्हणून गेली दोन-अडीच वर्षे पाठपुरावा करुन मविआ सरकार असताना मी कर्जतला दिवाणी न्यायालय मंजूर करुन आणलं. पण या सरकारने सत्तेत येताच या निर्णयाला स्थगिती दिली.”, असा संताप राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार (Rohit Pawar) यांनी काल व्यक्त केला होता. आज त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी केली आहे. 

“कर्जतमध्ये दिवाणी न्यायालय स्थापन करण्यास  मविआ सरकारच्या मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती. परंतु सध्या या निर्णयास स्थगिती देण्यात आली असून ती उठविण्यात यावी, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून रोहित पवारांनी केली आहे.

धोरणात्मक आणि सकारात्मक निर्णय घेतला जाईल….

कर्जतमधून दाखल होणाऱ्या दिवाणी दाव्यांची संख्या मोठी असून त्यातील अनेक दाव्यांसाठी ६५ कि.मी. प्रवास करुन अहमदनगर येथे जावं लागतं. त्यामुळे कर्जतला वरीष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाची गरज आहे. याबाबत धोरणात्मक आणि सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

केलेल्या कामाचं श्रेय घ्यायला हरकत नाही, पण न केलेल्या कामाचं श्रेय घेणारे माझ्या मतदारसंघात अनेकजण आहेत. कदाचित मी प्रयत्न करून मंजूर करून आणलेल्या दिवाणी न्यायालयाच्या बाबतीतही श्रेय घेण्यासाठी असे लोक पुढं यायला कमी करणार नाहीत. अशी टीका रोहित पवारांनी केली होती.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!