मुंबई : ऋषभ पंतने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात शानदार खेळी खेळली. या दमदार खेळीसाठी पंतला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. त्याला प्लेअर ऑफ द मॅचसाठी शॅम्पेनची बाटलीही भेट बक्षीस म्हणुन मिळाली होती. पंतने ती बाटली माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना दिल्याचा याचा एक व्हिडिओही समोर आला आहे. भारतीय संघाने तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा ५ गडी राखून पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने तीन सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली. शेवटच्या निर्णायक सामन्यात प्रथम खेळताना इंग्लंडचा संघ ४५.५ षटकांत २५९ धावा करून बाद झाला. प्रत्युत्तरात भारतीय संघाने ४२.१ षटकांत ५ बाद २६१ धावा करत सामन्यासह मालिकाही खिशात घातली.
सामन्यात एकवेळी टीम इंडियाने केवळ ७२ धावांवर ४ गडी गमावले होते. अशा स्थितीत संघ अडचणीत दिसत होता. मात्र येथून ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्याने डावाची धुरा सांभाळत पाचव्या विकेटसाठी १३३ धावांची शानदार भागीदारी केली. ऋषभ पंतने शेवटपर्यंत खेळपट्टीवर नाबाद राहून वनडे कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. त्याने ११३ चेंडूत १६ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने नाबाद १२५ धावा ठोकल्या. पराभव स्वीकारावा लागणार असे वाटत असताना ऋषभ पंतने संघाला ४२.१ षटकातच विजय मिळवून दिला.
या धडाकेबाज खेळीसाठी पंतला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर पंतने त्याला मिळालेली शॅम्पेनची बाटली रवी शास्त्रींना दिली. याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. शास्त्री सध्या इंग्लंडमध्ये समालोचनासाठी असून ते स्काय स्पोर्ट्ससाठी कॉमेंट्री करत होते. भारतीय संघाने इंग्लंडमध्ये वनडे आणि टी-२० अशा दोन्ही मालिका जिंकल्या आहेत. यापूर्वी कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत राहिली होती.
Pant offering his champagne to Ravi Shastri#INDvENG #OldTrafford #Pant #TeamIndia pic.twitter.com/n9HguNNuID
— Tejesh R. Salian (@tejrsalian) July 17, 2022
आगामी काळात भारतीय संघ वेस्टइंडीज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात संघाला एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळायचे आहेत. दरम्यान या मालिकेसाठी भारताच्या काही वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीसह अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहही या मालिकेत खेळणार नाही. विराट कोहली आशिया चषकाआगोदर क्रिकेटमधून एक महिना विश्रांती घेणार आहे. या काळात तो फॅमिलीसोबत लंडन शहरात राहणार असल्याचेही समोर आले आहे.
महत्वाच्या बातम्या :
- CM Eknath Shinde : राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; विकासकामांना स्थगिती न देण्याची मागणी
- Kishore Patil : शिवसेनेसारखी भाजपाची परिस्थिती होऊ नये यासाठी किरीट सोमय्यांना समज द्यावी – किशोर पाटील
- Bus accident in Indore । एकनाथ शिंदेंनी साधला मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद
- Eknath Shinde : इंदौरहून जळगावला येणाऱ्या बसचा अपघात; मुख्यमंत्री शिंदेंकडून १० लाखांच्या मदतीची घोषणा
- IND vs ENG : ऋषभ पंतच्या धडाकेबाज कामगिरीमागे ‘हा’ खेळाडू, ट्विटने केला खुलासा; वाचा!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

