Ramdas Kadam । नाशिक : शिवसेनेत फूट पडल्यापासून आदित्य ठाकरे अॅक्शन मोडवर दिसत आहेत. सध्या राज्यभर युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची निष्ठा यात्रा सुरु आहे. ते आज नाशिक दौऱ्यावर आले आहेत. मी गद्दारांना उत्तर देणार नाही. त्यांना मी बांधिल नाही. मी उत्तरं द्यावीत एवढी गद्दारांची लायकीही नाही, गद्दारी का केली? ही लोकांची भावना आहे. गद्दारांनी ते पाहावी, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांवर निशाणा साधला आहे. त्यानंतर आता शिंदे गटातील नेते देखील आदित्य ठाकरेंवर पलटवार केला. माजी मंत्री रामदास कदम यांनी टीका केली.
यावेळी बोलताना रामदास कदम यांनी अदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केलाय. बाळासाहेबांच्या मागे खंजीर कुणी खूपसला हे मी लवकरच बोलणार आहे. आदित्य ठाकरे यांचे जेवढे वय नाही तेवढी राजकारणाची आमची वर्षे आहेत, असं रामदास कदम यांनी म्हटलंय. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्याशी आमची कौटुंबिक चर्चा झाली. मी महाराष्ट्रात पुन्हा बाहेर पडणार आहे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ग्रामीण भागांपर्यंत पोहोचवणं आहे, असंही ते म्हणाले आहेत.
दरम्यान, सुहास कांदे यांनी देखील आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे. आदित्य ठाकरे वाघ आहेत, पण मटण खायच्याऐवजी डाळ भात खात आहेत. उद्धवसाहेब आमदार गेले पण तुमच्या आजू बाजूचे पोट भरणारे बडवे तिथेच आहेत, असं म्हणत त्यांनी आदित्य यांना टोला लगावला आहे. आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना 100 पत्र दिली. पण एकाही पत्राला उत्तर नाही म्हणून योजना रखडल्या. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि दुसऱ्या दिवशी परवानगी मिळाली.
महत्वाच्या बातम्या :
- Radhakrishna patil l महाराष्ट्रातील दोन्हीही काँग्रेस फुटीच्या मार्गावर आहेत – राधाकृष्ण विखे पाटील
- Samantha prabhu | “मला आणि नागाला एका खोलीत बंद केले तर…”; समंथा रुथ प्रभू काय म्हणाली वाचा
- Aditya Thackeray : “मी उत्तरं द्यावीत एवढी गद्दारांची लायकीही नाही”; आदित्य ठाकरे आक्रमक
- Suhas Kande : आदित्य ठाकरे वाघ, पण मटण खायच्याऐवजी डाळ भात खाताहेत; सुहास कांदे यांचा पलटवार
- IND vs WI ODI : टीम इंडियाला मोठा झटका, स्टार खेळाडू जखमी; मालिकेबाहेर जाऊ शकतो
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

