Share

Ramdas Kadam | शिवसेना का फुटली?, रामदास कदमांचं मोठं विधान म्हणाले…

Published On: 

मुंबई : एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत युती केल्यापासून शिवसेना पक्षामध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे. तेव्हापासूनच उद्धव ठाकरे यांचा ठाकरे गट आणि एकनाथ शिंदेंचा शिंदे गट, असे दोन गट पाहायला मिळत आहे. एवढंच नाहीतर दोन्ही गटातील नेते एकमेकांवर आरोप, टीकेबाजीही करतायेत. अनेकांना हा प्रश्न पडला आहे की, असं नेमकं काय झालं ज्यामुळे शिवसेना पक्षामध्ये एवढी मोठी दरी निर्माण झाली. अशातच याचसंदर्भात शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी एक वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले रामदास कदम ?

शिवसेनेची ताकद असती, तर 50 आमदार आणि 12 खासदार आपल्याला सोडून गेले नसते, असं म्हणत रामदास कदम यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. रामदास कदम यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

एक झेंडा, एक मैदान, एक विचार, एक नेता हे शिवसेना प्रमुखांच्या वेळी होते.राष्ट्रवादीतून भाड्याने आणलेल्या लोकांना नेते, उपनेते बनवून आमच्या अंगावर सोडलं जात आहे. त्याची सर्व उत्तर उद्याच्या मेळाव्यात मिळतील, असंही रामदास कदम यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, 5 सप्टेंबर रोजी होणाऱ्या दसरा मेळाव्यामध्ये शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या मेळाव्याला उपस्थित राहणार की, एकनाथ शिंदे यांच्या?, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!